Tuesday, April 23, 2024

ऋतिक रोशनने वधू-वरांसोबत केला डान्स; व्हिडिओ पाहून युजर्स म्हणाले, ‘यासाठी मी माझ्या पतीला सोडेल…’

बॉलीवूडच्या सर्वोत्कृष्ट डान्सरचा विचार केला तर सर्वात आधी ऋतिक रोशनचे नाव येते. पहिल्याच चित्रपटापासून आपल्या लूक, अभिनय आणि नृत्य कौशल्याने प्रेक्षकांना वेड लावणारा ऋतिक रोशन आता कोणत्याही परिचयावर अवलंबून नाही. तो कुठेही गेला तरी लोक वेड्यासारखे त्याच्यासोबत सेल्फी काढण्यासाठी पुढे येतात. नुसते सेल्फीच नाही, तर या टॅलेंटेड डांसरसोबत नाचण्याची संधीही कोणी गमावू इच्छित नाही.

ऋतिक रोशनचे डांसिंग स्किल्स सर्वांनीच पाहिले आहे. अशात ‘विक्रम वेध’ अभिनेत्याचा नुकताच एक व्हिडिओ सोशल मीडियावर समोर आला आहे, ज्यामध्ये तो एका लग्नात डान्स करताना दिसत आहे. ऋतिक वधू-वरांसोबत ‘घुंगरू टूट गये’वर ठुमके लावताना दिसत आहे, ज्याने तेथील वातावरण अधिकच मनोरंजक झाले आहेत.

माध्यमातील वृत्तानुसार, हा व्हिडिओ ऋतिकच्या मित्राच्या लग्नाचा आहे. हँडसम हंक ऋतिक रोशनने काळ्या रंगाचा सूटबूट घालून लग्नाला हजेरी लावली आणि आपल्या डान्सने तिथे बसलेल्या लोकांची मने जिंकली. मात्र, या फंक्शन आणि व्हिडिओबाबत अधिक माहिती समोर आलेली नाही.

चाहत्यांनी पुन्हा एकदा ऋतिक रोशनच्या सुरेख डान्सचे कौतुक केले आहे. एका युजरने कमेंट करत लिहिले की, ‘माझ्यासोबत असे झाले, तर मी माझ्या पतीला विसरेन.’ , तर आणखी एका युजरने लिहिले की, ‘ऋतिक असा दुर्मिळ अभिनेता आहे, ज्याला बॅकग्राउंड डान्सरची गरज नाही.’

Hrithik dancing in a wedding
by u/Grocery_Extreme in BollyBlindsNGossip

ऋतिक रोशनच्या वर्क फ्रंटबद्दल बाेलायचे झाले तर, अभिनेता सिद्धार्थ आनंद दिग्दर्शित ‘फाइटर’मध्ये दिसणार आहे. ‘वॉर’ आणि ‘बँग बँग’ नंतर ‘फाइटर’ हा ऋतिक आणि सिद्धार्थचा तिसरा एकत्र चित्रपट असेल. या चित्रपटात तो एअरफोर्स ऑफिसरच्या भूमिकेत दिसणार आहे.’फायटर’चे भारतातील पहिले रिअल अॅक्शन चित्रपट म्हणून वर्णन केले जात आहे. या चित्रपटात ऋतिकसोबत दीपिका पदुकोणही महत्वाच्या भूमिकेत दिसणार आहे. या चित्रपटा अंतर्गत ऋतिक आणि दीपिका पहिल्यांदाच स्क्रिन शेअर करणार आहेत.(bollywood actor hrithik roshan dancing to ghunghroo toot gaye in marriage video viral)

दैनिक बोंबाबोंबचा व्हॉट्सऍप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बोंबाबोंबचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
‘हो, माझी चूक होती…’ सलमान खानने वाईट बॉयफ्रेंड असल्याची दिली कबुली, उघड केले इतके मोठे गुपित

‘या’ दिग्गज गायकाच्या लाईव्ह कॉन्सर्टमध्ये पोलिसांची एन्ट्री, स्टेजवर जात गायकाला गाणे गाण्यापासून रोखले

हे देखील वाचा