Sunday, December 8, 2024
Home बॉलीवूड ‘हो, माझी चूक होती…’ सलमान खानने वाईट बॉयफ्रेंड असल्याची दिली कबुली, उघड केले इतके मोठे गुपित

‘हो, माझी चूक होती…’ सलमान खानने वाईट बॉयफ्रेंड असल्याची दिली कबुली, उघड केले इतके मोठे गुपित

किसी का भाई किसी की जान‘ या चित्रपटामुळे सलमान खान चांगला चर्चेत आहे. अशात आता अभिनेता त्याच्या नात्याबद्दलच्या कबुलीमुळे पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. खरे तर, सलमान खान नुकताच ‘आप की अदालत‘चा भाग झाला, जिथे त्यांनी अनेक मुद्द्यांवर चर्चा केली. यादरम्यान, त्याने आपल्या वैयक्तिक आयुष्याबद्दलही मोकळेपणाने सांगितले. अभिनेत्याने त्याच्या अयशस्वी संबंधांबद्दल कबूल केले की, तो एक चांगला प्रियकर होऊ शकत नाही आणि प्रत्येक वेळी त्याच्या स्वत:च्या चुकीमुळे नाते तुटले.

मुलाखतीत सलमान खान (salman khan) याला त्याच्या अनेक रिलेशनशिप आणि आतापर्यंत सेटल न होण्यामागचे कारण विचारण्यात आले. यावर अभिनेता हसला आणि म्हणाला की, “नात्याच्या बाबतीत मी दुर्दैवी आहे. योग्य व्यक्ती आल्यावर मी सेटल होईन.”

आपल्या रिलेशनशिप बोलताना सलमान खान म्हणाला, “सगळे चांगले होते. मात्र, चूक माझी होती, जेव्हा पहिली गेली तेव्हा वाटले की, ही तिची चूक आहे, दुसरी गेली, तेव्हाही वाटले की, ही तिची चूक आहे. मात्र, नंतर तिसरी निघून गेली तेव्हाही हाच प्रॉब्लेम होता. चौथा गेल्यावर वाटले की, कमी त्यांच्यात आहे की, माझ्यात?”

अभिनेता पुढे म्हणाले, “पाचवी गेली तेव्हाही 60-40 टक्के प्रकरण असेच होते, पण त्यानंतर जेव्हा ती निघूनच गेली तेव्हा तिने पुष्टी केली की, ही माझी चूक आहे. त्यामुळे ही कोणाची चूक नाही, माझी चूक आहे. कदाचित त्यांना भीती वाटली असेल की, जसे जीवन त्यांना हवे आहे तसे मी देऊ शकत नाही. आता ते सर्व जिथे आहेत तिथे खूप आनंदी आहेत.”

सलमान खानने या मुलाखतीत असाही खुलासा केला की, त्याला मुलांवर प्रेम आहे आणि त्याला वडीलही व्हायचे आहे, पण तो लग्न करण्याच्या बाजूने नाही. करण जोहर सरोगसीच्या माध्यमातून बाप बनल्याचा संदर्भ देत भाईजान म्हणाला की, ‘त्यालाही हा मार्ग अवलंबायचा होता, पण त्यानंतर देशात सरोगसीचे नियम बदलले.'( bollywood actor salman khan talks about his ex girlfriends and admits being a bad boyfriend in his relationships )

दैनिक बोंबाबोंबचा व्हॉट्सऍप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बोंबाबोंबचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
सनी लिओनीची कातिल अदा, फिगर पाहून चाहते फिदा

“माझ्या चेहऱ्यावर असलेला आनंद” महाराष्ट्र शाहीर सिनेमातून अभिनयात पदार्पण करणाऱ्या सना शिंदेची ‘ती’ पोस्ट व्हायरल

author avatar
Team Bombabomb

हे देखील वाचा