चित्रपटसृष्टीत अनेक दिग्गज अभिनेते आपल्या साध्या सरळ स्वभावासाठी ओळखले जातात. यातीलच एक अभिनेते म्हणजेच ज्यांना ‘आपना भिडू’ म्हणून ओळखले जाते ते ‘जॅकी श्रॉफ’ होय. जॅकी यांचा साधेपणा पुन्हा एकदा सर्वांसमोर आला आहे. त्यांनी आपल्या घरात काम करणाऱ्या मुलीच्या आजीचे निधन झाल्याचे समजल्यानंतर थेट त्या मुलीचे घर गाठले. त्यांनी पुणे जिल्ह्यातील मावळ येथील पवनानगर येथे राहणाऱ्या या मुलीच्या कुटुंबाची भेट घेतली.
जॅकी यांच्याकडे काम करणाऱ्या दिपाली तुपे या मुलीच्या आजीचे तान्हाबाई ठाकर यांचे नुकतेच निधन झाले होते. विशेष म्हणजे तान्हाबाई यांनी वयाच्या शंभराव्या वर्षी अखेरचा श्वास घेतला होता. त्यांचे निधन झाल्याचे समजताच जॅकी यांनी दिपालीचे घर गाठले आणि तिच्या कुटु्ंबाला धीर दिला. यावेळी ते चक्क कुटुंबातील सदस्याप्रमाणे अगदी खाली बसून घरातील व्यक्तींची विचारपूस केली. हे पाहून घरातील मंडळीही एवढा मोठा अभिनेता आपल्या घरी आल्याचे पाहून आश्चर्यचकित झाले.
मनाचा मोठेपणा… घरकाम करणाऱ्या मुलीच्या कुटुंबाचं सांत्वन करण्यासाठी थेट मावळमध्ये पोहचला जॅकी श्रॉफ
.
.
.
.#Pune #MarathiNews #Neesupdate #BREAKING #bollywood #jackieshroff #maharashtra #like #follow #like4like #like #likeforlike #follow4follow #followmwm #follow #me pic.twitter.com/n4qrLcUSKB— Sandip Kale (@sandipkale82) March 13, 2021
जॅकी यांनीदेखील वाईट परिस्थितीची सामना करत नाव कमावले आहे. त्यांनी आपल्या सुरुवातीचा काळ एका चाळीत काढल्याने त्यांची नाळ सामान्य व्यक्तींशी अगदी घट्ट जोडली आहे. विशेष म्हणजे जॅकी यांचा मावळातील चांदखेडमध्ये बंगला आहे. इथे ते अनेकदा विश्रांतीसाठी फिरकत असतात.
जॅकी यांनी सन १९८२ मध्ये दादा या चित्रपटातून अभिनयाची सुरुवात केली होती. यानंतर त्यांनी कधीच मागे वळून पाहिले नाही. त्यांनी आतापर्यंत ‘हीरो’, ‘कर्मा’, ‘दूध का कर्ज’, ‘साहो’, ‘परिंदा’, ‘त्रिदेव’, ‘बॉर्डर’, ‘ब्रदर्स’, ‘अंगार’ यांसारख्या चित्रपटांमध्ये काम केले आहे.
दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…
हेही नक्की वाचा-
-सांगलीची मराठमोळी अभिनेत्री सई ताम्हणकर दिसली हटके अंदाजात! चाहत्यांकडून फोटोंना जबरदस्त पसंती
-‘भाईजान’ सलमान खानने शब्द पाळला; ‘राधे: योर मोस्ट वाँटेड भाई’ चित्रपटाचे पोस्टर केलं रिलीझ
-‘बुसीट चॅलेंज’ फॉलोव करत दीपिका पदुकोणने केला व्हिडिओ शेअर; ‘दीपवीरचा’ निराळा डान्स होतोय व्हायरल