‘बुसीट चॅलेंज’ फॉलोव करत दीपिका पदुकोणने केला व्हिडिओ शेअर; ‘दीपवीरचा’ निराळा डान्स होतोय व्हायरल

deepika padukone dance with ranveer singh in unique style video viral on internet


बॉलिवूडच्या सर्वात प्रसिद्ध आणि लाडक्या जोडींपैकी एक म्हणजेच दीपिका पदुकोण आणि रणवीर सिंग यांची जोडी होय. हे दोघेही चित्रपटांसोबतच सोशल मीडियावरही सक्रिय असते. त्यांच्या प्रत्येक पोस्टला चाहत्यांकडून खूप प्रेम मिळते. दीपिका पदुकोणने नुकताच एक व्हिडिओ शेअर केला आहे. हा व्हिडिओ जोरदार व्हायरल होत आहे.

यात ती रणवीर सिंगसोबत मस्ती करताना दिसत आहे. या व्हिडिओमध्ये त्यांची स्टाईल पाहण्यासारखी आहे. त्यांच्या डान्सचा हा निराळा अंदाज चाहत्यांना खूप आवडला आहे. दीपिकाच्या या डान्स व्हिडिओला चाहत्यांनी बऱ्याच प्रतिक्रिया दिल्या आहेत.

दीपिकाने व्हिडिओ पोस्ट करत कॅप्शनमध्ये लिहिले, “वर्क इट बेबी.” तिने व्हिडिओमध्ये रणवीर सिंगला टॅग देखील केले आहे. हा व्हिडिओ बुसीट चॅलेंज या हॅशटॅगखाली तयार केला आहे. व्हिडिओला अवघ्या एका तासामध्ये 4 लाखांहून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत. व्हिडिओवर चाहत्यांसमवेत सेलेब्सही जोरदार प्रतिक्रिया देत आहेत.

दीपिका पदुकोण आणि रणवीर सिंगने 2018 साली लग्न केले होते. दोघेही लवकरच ’83’ या चित्रपटात दिसणार आहेत. 1983 मध्ये भारतीय क्रिकेट संघाच्या ऐतिहासिक विजयाच्या आधारे रणवीर या चित्रपटात कपिल देव यांची भूमिका साकारताना दिसणार आहे.

सन 1983 मधील क्रिकेट विश्वचषकातील भारताच्या विजयाची ही कथा लवकरच मोठ्या पडद्यावर प्रेक्षकांचे मनोरंजन करताना दिसणार आहे. दीपिका अखेरच्या वेळेस ‘छपाक’ चित्रपटात दिसली होती. दीपिका सध्या शाहरुख खानसोबत ‘पठाण’ चित्रपटाच्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-‘नाही सलवार रंगब…’, होळीवरील नवीन भोजपुरी गाणं प्रेक्षकांच्या भेटीला, एकाच दिवसात लाखो हिट्स

-अरबाज खानची गर्लफ्रेंड जॉर्जिया एंड्रियानीने लावले ‘सैंया जी’ गाण्यावर ठुमके, स्टेप्स आणि एक्सप्रेशन्स पाहून चाहते घायाळ

-‘एक्सप्रेशन क्वीन’ अक्षरा सिंगला विचारला असा प्रश्न की भडकली अभिनेत्री, चिडलेल्या अंदाजावर चाहते फिदा; व्हिडिओ व्हायरल


Leave A Reply

Your email address will not be published.