Wednesday, July 3, 2024

‘मी १० दिवस फक्त पाणी पिऊन काढले’, केआरकेने सांगितला तुरुंगातील भयाण अनुभव

बाॅलिवूड क्रिटिक कमाल राशिद खान यानी जेलमधून बाहेर पडल्यानंतर विविध खुलासे केले आहेत. कधी म्हणतो की, तो बदला घेण्यासाठी तयार आहे तर कधी आपल्या वक्तव्यापासून पलटतो. नुकताच त्याने एक नवीन खुलासा केला आहे. केआरकेने (Kamaal Rashid Khan) लिहिले, “मी लाॅकअपमध्ये फक्त पाणा पिऊन दिवस काढले. त्यामुळे 10 दिवसात मी 10किलाे वजन कमी केले आहे.”

याआधी केरआरकेने ट्वीट करत स्पष्टीकरण दिले की, ते घरी परत आले आहे आणि सुरक्षित आहे. त्याला कोणाचाही काेणताही बदला घ्यायचा नाही आहे. इतकच नाहीतर तो म्हणाला, त्याच्याबराेबर जे काही झाले ते विसरुन तो पुढे गेला आहे.

केआरकेला नुकतंच एका ट्वीटसाठी 30 ऑगस्टला मुंबई एयरपोर्ट येथून अटक करण्यात आली हाेती. त्यानंतर केआरकेला 14 दिवसाच्या न्यायालयीन कोठडीत पाठवण्यात आले. तर झाले असे हाेते की, केआरकेने ट्विट करून  लिहिले हाेते, “काेराेेना व्हायरस ताेपर्यंत नाही जाणार जाेपर्यंत ताे आपल्यासाेबत काही प्रसिद्ध लाेकांना घेऊन जात नाही. त्यावेळी मी नाव घेतले नव्हते पण मला पहिल्यापासून माहित हाेते की, ऋषी आणि इरफान जाणार. मला हे सुद्धा माहित आहे की, पुढचा नंबर कुणाचा आहे.”

या व्यतिरिक्त कमाल राशिद खानवर सेक्शुअल फेवर मागण्याचाही आराेप आहे. केआरकेवर या आठवड्याच्या दुसऱ्या दिवशीच तीन वर्ष जुन्या केस संदर्भात अटक करण्यात आली हाेती. केआरकेवर महिला फिटनेस ट्रेनरने विनयभंगचा आराेप केला हाेता. तिने म्हटले की, केआरकेने तिला सेक्शुअल फेवर मागितले. इतकच नाहीतर त्याने तिचा जबरदस्तीने हात पकडला. परंतु त्यावेळी ती केआरकेच्या इंडस्ट्री कनेक्शनला घाबरत हाेती. त्यामुळे तिने काेणतीही तक्रार केली नाही. या प्रकरणात तीन वर्षानंतर पिडीताच्या तक्रारीवरुन वर्सोवा पाेलिसाने केआरकेला अटक केली.
दैनिक बाेंवबाबाेंबचा व्हाॅटसऍप ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
आता ओटीटीवरही पाहता येणार रणबीर- आलियाचा ‘ब्रह्मास्त्र’, पण कोणत्या प्लॅटफॉर्मवर होणार रिलीज?
मनीषने भर कार्यक्रमात चालण्यावरून उडवली मलायकाची खिल्ली, परिणीतीपासून वरुणपर्यंत सगळेच हसून बेजारआता खिशाला नाही बसणार फटका! फक्त 75 रुपयात ‘या’ दिवशी पाहू शकता आवडीचा सिनेमा

हे देखील वाचा