बाॅलिवूड अभिनेता सनी देओलचा मुलगा करण देओल 18 जून रोजी द्रिशा आचार्यसोबत लग्नगाठ बांधणार आहे. अशात सध्या करण त्याचा प्री-वेडिंग फंक्शन्स एन्जाॅय करत आहे. दरम्यान त्याच्या संगीत सेरेमनीचे अनेक व्हिडिओ समोर येत आहेत. या व्हिडिओंमध्ये, सनी देओल मुलगा करणच्या संगीतात जोरदार नाचताना दिसत आहे, तर धर्मेंद्रही आपल्या नातवाच्या संगीत कार्यक्रमात नाचताना दिसत आहे.
संगीत सोहळ्यात सनी देओल (sunny deol) ‘गदर’ चित्रपटातील लूकमध्ये दिसत आहे. अशात जेव्हा ‘गदर’ या सुपरहिट चित्रपटातील ‘मैं निकला गड्डी लेके’ हे गाणे कार्यक्रमात वाजले, तेव्हा त्यांनी त्यावर जबरदस्त डान्स केला.
View this post on Instagram
मंडळी, सनी देओलचा चित्रपट ‘गदर’ 2001मध्ये रिलीज झाला होता, जो आता 22 वर्षांनी 09 जून 2023 रोजी पुन्हा थिएटरमध्ये प्रदर्शित झाला आहे. अशात आता ‘गदर’चा सीक्वल ‘गदर 2’ यावर्षी 11 ऑगस्टला देशभरातील चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होत आहे.
View this post on Instagram
धर्मेंद्रही आपला नातू करणच्या संगीत सोहळ्यात डान्स करण्यात मागे राहिले नाही. त्यांनी त्यांच्या चित्रपटातील ‘यमला पगला दीवाना’ या गाण्यावर नातू करण देओलसोबत जबरदस्त डान्स केला. करणच्या संगीत सोहळ्यात सनी देओल आणि बॉबी देओलचा चुलत भाऊ आणि अभिनेता अभय देओलही स्टेजवर थिरकताना दिसला.
View this post on Instagram
करण देओलही त्याच्या संगीत सोहळ्याचा मनमुराद आनंद लुटताना दिसला. अभिनेत्याने त्याचा धाकटा भाऊ राजवीर देओलसोबत ‘यमला पगला दिवाना’ गाण्यावर जबरदस्त डान्स केला.
संगीत कार्यक्रमात करणची हाेणारी पत्नी द्रिशा आचार्य हिनेही डान्स करून सर्वांचे लक्ष वेधले. द्रिशा आचार्य ही चित्रपट निर्माता बिमल रॉय यांची नात आहे. द्रिशाचे आई-वडील सुमित आचार्य आणि चिमू आचार्य दुबईत राहतात. अशात सध्या द्रिशा मिडिल-ईस्टमध्ये एक टॉप इवेंट मॅनेजमेंट कंपनी चालवत आहे.(bollywood actor karan deol wedding sunny deol dharmedra abhay deol danced on yamla pagla deewane )
‘माझ्या पतीवर अवलंबून…’ प्रियांका चोप्राने केले कुटुंब आणि दैनंदिन जीवनाबद्दल मोठे वक्तव्य
पुतण्याच्या संगीत सोहळ्यात बॉबी देओलने पत्नीसोबत केला रोमँटिक डान्स, पाहा व्हिडिओ