Friday, December 8, 2023

पुतण्याच्या संगीत सोहळ्यात बॉबी देओलने पत्नीसोबत केला रोमँटिक डान्स, पाहा व्हिडिओ

बॉलिवूडमधील देओल कुटुंबात सध्या आनंदाचे वातावरण आहे. खरे तर, अभिनेता सनी देओलचा मोठा मुलगा करण देओल विवाहबंधनात अडकणार आहे. अशात 12 जूनपासून करण आणि द्रिशाच्या प्री-वेडिंग फंक्शन्सला सुरुवात झाली आहे. या सगळ्यात करणचा संगीत सोहळा शुक्रवारी (17 जुन)ला पार पडला, ज्यांचे फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल हाेत आहेत.

दरम्यान, करणचे काका आणि अभिनेता बॉबी (bobby deol) यांचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. बॉबीने पत्नी तान्यासोबत भाच्याच्या संगीत समारंभात ‘बरसात’ चित्रपटातील ‘हमको सिरफ तुमसे प्यार है’ या रोमँटिक गाण्यावर परफॉर्म केले. असात दोघांच्या डान्सचा व्हिडिओ इंस्टाग्रामवर जाेरदार व्हायरल होत आहे.

यावेळी बाॅबी देओल देसी पंजाबी लूकमध्ये दिसत असून त्याने संगीत समारंभासाठी क्रीम कलरचा कुर्ता पायजमा आणि पिवळे जॅकेट परिधान केलेले दिसत आहेत. दुसरीकडे, त्याची पत्नी तान्या पिवळ्या रंगाच्या लेहेंग्यात खुपच सुंदर दिसत आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Viral Bhayani (@viralbhayani)

या व्हिडिओवर अनेक चाहते कमेंट करत आहेत. एका चाहत्याने कमेंट करत लिहिले की, ‘बॉबीचा 90च्या दशकातील काळ शानदार होता., तर दुसऱ्या युजरने कमेंट करत लिहिले की,”लव्हली, खूप सुंदर जोडपे.” अशात एका चाहत्याने कमेंट करत लिहिले की, “माझ्या लहानपणीचे आवडते गाणे.”

 

View this post on Instagram

 

A post shared by Viral Bhayani (@viralbhayani)

करणची हाेणारी पत्नी द्रिशा आचार्य ही चित्रपट निर्माता बिमल रॉय यांची नात आहे. द्रिशाचे आई-वडील सुमित आचार्य आणि चिमू आचार्य दुबईत राहतात. अशात सध्या द्रिशी मिडिल-ईस्टमध्ये एक टॉप इवेंट मॅनेजमेंट कंपनी चालवत आहे.(bollywood bobby deol romantic dance with wife in bhatije karan deol sangeet ceremony )

हे देखील वाचा