सण 2022 हे वर्ष बॉलीवूडसाठी बॉक्स ऑफिसवरील यशाच्या बाबतीत काही खास ठरले नाही, परंतु कार्तिक आर्यनसाठी हे वर्ष खूप खास होते. अनेक बड्या स्टार्सचे चित्रपट बॉक्स ऑफिसवर फ्लॉप झाले असताना, कार्तिकच्या वाट्याला आलेल्या ‘भूल भुलैया 2‘, ‘फ्रेडी‘ या चित्रपटांनी दमदार कमाई केली. प्रेक्षकांकडून मिळालेल्या अफाट प्रेमाने हे वर्ष कार्तिकसाठी संस्मरणीय ठरले. सोशल मीडियावर त्याच्या आयुष्यातील तीन खास फाेटाे शेअर करून कार्तिकने या वर्षाचा निरोप घेतला, ज्याची साेशल मीडियावर प्रचंड चर्चा हाेत आहे. काय आहे त्या तीन फाेटाेमध्ये? चला जाणून घेऊया…
जिथे बॉलीवूडचे सगळे कलाकार एकाच हिट चित्रपटासाठी आसुसलेले हाेते, तिथे कुणाला दोन यशस्वी चित्रपट मिळाले तर यापेक्षा आनंद कोणता असेल? थिएटरमध्ये प्रदर्शित झालेल्या ‘भूल भुलैया 2’ या चित्रपटाच्या यशाने बॉलीवूडची खिन्नता दूर करण्याचे काम केले आहे. त्याचवेळी ओटीटीवर रिलीज झालेला ‘फ्रेडी’ प्रेक्षकांमध्ये चांगलाच पसंत केला जात आहे.
View this post on Instagram
कार्तिक आर्यनने त्याच्या तीन चित्रपटांचे फोटो इंस्टाग्रामवर शेअर केले आणि कॅप्शनमध्ये लिहिले, “बाय-बाय 2022, तू खूप खास होतास. मला आशा आहे की, माझ्या आयुष्यात 2022 सारखी आणखी वर्षे येतील. मला 3 सर्वात मोठे ब्लॉकबस्टर दिल्याबद्दल धन्यवाद.” ‘भूल भुलैया 2’, ‘फ्रेडी’, ‘कटोरी’ असे हॅशटॅग कार्तिकने वापरले.
‘काटोरी’ हे कार्तिक आर्यनच्या पाळीव कुत्र्याचे नाव आहे, ज्यावर तो खूप प्रेम करतो आणि त्याचे फोटो सोशल मीडियावर शेअर करतो. त्याच वेळी, ‘भूल भुलैया 2’ ने बॉक्स ऑफिसवर जवळपास 186 कोटींचा व्यवसाय केला होता. हा या वर्षातील सर्वाधिक कमाई करणारा चित्रपट ठरला आहे.
कार्तिक आर्यनच्या आगामी चित्रपटांबद्दल बोलायचे झाले तर, कार्तिक ‘शहजादा’, ‘सत्यप्रेम की कथा’, ‘आशिकी 3’ या चित्रपटांमध्ये दिसणार आहे. (bollywood actor kartik aaryan hope more 2022 in his life actor happy for bhool bhuliayaa 2 freddy and katori biggest blockbusters)
दैनिक बोंबाबोंबचा व्हॉट्सऍप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बोंबाबोंबचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
विजय सेतुपतीपासून ते नयनतारापर्यंत हे साऊथ स्टार्स 2023 मध्ये बाॅलिवूडमध्ये करणार पदार्पण
Bye Bye 2022| कायम आठवणीत राहतील असे शेफाली शाहचे 5 संस्मरणीय भूमिका, पाहाच यादी