Tuesday, January 31, 2023

Bye Bye 2022| कायम आठवणीत राहतील असे शेफाली शाहचे 5 संस्मरणीय भूमिका, पाहाच यादी

शेफाली शाह बॉलिवूड इंडस्ट्रीतील सर्वात टॅलेंटेड अभिनेत्रींपैकी एक आहे. तिला कमर्शियल चित्रपटाबराेबरच आर्ट चित्रपटही करायला आवडते. ती चित्रपटाच्या बजेटमुळे किंवा विरुद्ध कलाकारांमुळे नाही, तर त्यांच्या कथेने प्रभावित झाल्यामुळे चित्रपट करण्यास प्राधान्य देते. तिने या वर्षात अनेक हिट चित्रपट आणि सीरिज दिल्या आहेत. तिने एका मुलाखतीत सांगितले होते की, या वर्षी तिने आयुष्यात सर्वाधिक चित्रपट- वेबसीरिज केल्या आहेत. या सर्व चित्रपट आणि वेबसीरिज मधून तिनं आपली दमदार व्यक्तिरेखा दाखवली आहे. शेफालीने तिच्या पात्राने अनेक दिग्गज कलाकारांना टक्कर दिली आहे.

तर मंडळी आज आम्ही तुम्हाला 2022 मध्ये रिलीज झालेल्या शेफाली शाह (shefali shah) हिच्या चित्रपट आणि वेब सीरिजबद्दल सांगत आहोत. वर्षाच्या पहिल्याच महिन्यापासून तिने प्रेक्षकांचे उत्स्फूर्त मनोरंजन केले. एवढेच नाही तर या चित्रपटांसाठी तिला अनेक पुरस्कारांसाठी नॉमिनेटही करण्यात आले आहे.

ह्यूमन (Human)
‘ह्यूमन’ ही मेडिकल थ्रिलर मालिका आहे. जी डिस्ने प्लस हॉट स्टारवर जानेवारीमध्ये स्ट्रीम झाली. या मालिकेत कीर्ती कुल्हारी, राम कपूर, विशाल जेठवा यांसारखे टॅलेंटेड कलाकार होते. या मालिकेत शेफाली डॉक्टरच्या भूमिकेत होती. ही सीरिज जिवंत लोकांवर ड्रग टेस्ट करणाऱ्या आणि वैद्यकीय घोटाळे करणाऱ्यांवर आधारित आहे. या मालिकेत शेफाली निगेटिव्ह भूमिकेत होती, ज्याला खूप पसंती मिळाली.

जलसा (Jalsa)
शेफाली शाह आणि विद्या बालनच्या ‘जलसा’ला प्रेक्षक आणि समीक्षकांनी भरभरून दाद दिली. चित्रपटात दोन आईंची स्टाेरी दाखवण्यात आली आहे. चित्रपटात शेफाली एका मोलकरणीची भूमिका साकारत आहे, तर विद्या बालन तिची मालकिन  आणि प्रसिद्ध पत्रकार आहे. विद्याच्या कारने शेफालीच्या मुलीचा अपघात हाेताे आणि त्यानंतर दोघांमध्ये जोरदार भांडण हाेतात. या चित्रपटासाठी विद्यापेक्षा शेफालीचे जास्त कौतुक झाले.

दिल्ली क्राइम 2 (Dlehi Crime Season 2)
पहिल्या सीझनप्रमाणेच ‘दिल्ली क्राईम सीझन 2’ मध्ये शेफाली शाहने एक दमदार भूमिका साकारली होती. मात्र, सीझन 1 प्रमाणे सीझन 2 लाेकप्रियता मिलवू शकला नाही. पहिल्या सीझनला सर्वोत्कृष्ट नाटकाच्या श्रेणीत आंतरराष्ट्रीय एमी अवॉर्ड मिळाला.

डार्लिंग्स (Darlings)
जलसा, ह्यूमन आणि दिल्ली क्राइममध्ये गंभीर भूमिका साकारल्यानंतर शेफाली शाहने ‘डार्लिंग’मध्ये एक मजेदार आणि दमदार पात्र साकारले. यामध्ये ती आलिया भट्टची आई झाली. या चित्रपटात विजय वर्माही मुख्य भूमिकेत होता. समीक्षक आणि प्रेक्षकांनी या चित्रपटाचे आणि त्यातील कलाकारांचे कौतुक केले. आलियासोबत शेफालीची फनी स्टाइलही प्रेक्षकांना चांगलीच आवडली होती.

डॉक्टर जी (Doctor G)
शेफाली शाहचा यावर्षीचा 5वा प्रोजेक्ट ‘डॉक्टर जी’ होता. या चित्रपटात ती डॉक्टरच्या भूमिकेत दिसली होती. या चित्रपटात तिची महत्त्वाची भूमिका होती. या चित्रपटात शीबा चढ्ढा, आयुष्मान खुराना आणि रकुलप्रीत सिंग सारखे टॅलेंडेट कलाकार होते. समीक्षकांनी या चित्रपटाचे भरभरून कौतुक केले. रकुल शेफालीसमोर फिकी दिसत होती.(web series actre`s`s shefali shah 2022 movies web series human delhi crime 2 doctor g rakulpreet singh darlings alia bhatt)

दैनिक बोंबाबोंबचा व्हॉट्सऍप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बोंबाबोंबचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
सनी लियाेनची स्टाईल एकदम भारी! एकदा फोटो पाहाच

Year Ender| ‘या’ 5 अभिनेत्रींना त्यांच्या प्रेग्नेंसीमुळे करावा लागला ट्राेलिंगचा सामना

हे देखील वाचा