Monday, December 23, 2024
[aioseo_breadcrumbs]

काय सांगता! कार्तिक आर्यनला मिळालेत ‘१८० कोटी प्रपोजल’, सांगितले कधी करणार लग्न

मागील महिन्यात प्रदर्शित झालेला ‘भूल भुलैय्या २‘ हा सिनेमा बॉक्स ऑफिसवर चांगलाच धुमाकूळ घालत आहे. अभिनेता कार्तिक आर्यन, कियारा आडवाणी आणि तबू यांच्या मुख्य भूमिका असलेला हा सिनेमा कमाईचे नवीन विक्रम बनवत सुसाट सुटला आहे. या सिनेमाने आतापर्यंत १८० कोटी रुपयांहून अधिक कमाई केली आहे. अभिनेता कार्तिक हा आपल्या चाहत्यांची मने जिंकण्याची एकही संधी सोडत नाही. अशात कार्तिकने ट्विटरवर #AskKartik सेशन ठेवले होते. यावर त्याने चाहत्यांच्या प्रश्नांची उत्तरे दिली. आता ट्विटरवर #AskKartik ट्रेंड होत आहे.

कार्तिकने दिली प्रश्नांची उत्तरे
कार्तिक आर्यन (Kartik Aaryan) याने #AskKartik या सेशनदरम्यान आपल्या चाहत्यांच्या अनेक प्रश्नांची उत्तरे दिली. या प्रश्नांमध्ये सर्वात मजेशीर प्रश्न हा होता की, कार्तिकला आतापर्यंत किती प्रपोजल्स मिळाले आहेत. यावर कार्तिकनेही चांगलेच उत्तर दिले.

तब्बल १८० कोटी प्रपोजल्स
सोशल मीडियावर एका युजरने ट्वीट करत लिहिले की, “या आठवड्यात तुम्हाला किती प्रपोजल्स मिळाले?” या प्रश्नाचे उत्तर देताना कार्तिक म्हणाला की, “एकप्रकारे, आतापर्यंत १८० कोटी प्रपोजल आले आहेत.” खरं तर कार्तिकने या ठिकाणी ‘भूल भुलैय्या २’ या सिनेमाच्या कमाईचा उल्लेख केला आहे.

कार्तिक आर्यन आहे क्रश
दुसऱ्या एका युजरने ट्वीट करत विचारले की, “जवळपास प्रत्येकाचा क्रश बनल्यानंतर कसे वाटते?” यावर कार्तिकने आपलाच एक गिफ शेअर करत “आनंदी आणि नम्र,” असे लिहिले.

कार्तिकला कोणत्या नावाने बोलवायचे?
आणखी एका ट्विटर युजरने कार्तिकला प्रश्न विचारला की, “सुपरस्टार, बॉक्स ऑफिस किंग, शहजादा, तुम्हाला कोणत्या नावाने बोलवायचे?” या प्रश्नाचे उत्तर देताना कार्तिकने नम्रपणे लिहिले की, “प्रेमाणे जे बोलायचंय, ते बोला.”

लग्न कधी करणार?
कार्तिकचा चाहता असलेल्या एकाने ट्वीट करत लग्नाबाबत प्रश्न विचारला. तो म्हणाला की, “भावा लग्न कधी करणार?”, या प्रश्नाचे उत्तर देताना कार्तिक म्हणाला की, “इतकी घाई का आहे भावा.” यासोबतच कार्तिकने एक मजेशीर इमोजीही शेअर केला.

कार्तिकचे आगामी प्रोजेक्ट्स
कार्तिक हा त्या अभिनेत्यांपैकी एक आहे, ज्यांनी स्वत:च्या जोरावर नाव कमावले आहे. कार्तिकने आतापर्यंत अनेक सिनेमात काम केले आहे. त्याला ‘प्यार का पंचनामा’ या सिनेमातून प्रसिद्धी मिळाली होती. नुकताच तो ‘भूल भुलैय्या २’ या सिनेमात झळकला होता. अशात आता त्याच्या आगामी सिनेमांबद्दल बोलायचं झालं, तर तो ‘फ्रेडी’, ‘कॅप्टन इंडिया’, ‘शहजादा’ आणि ‘सत्यनारायण’ यांसारख्या सिनेमांमध्ये दिसणार आहे.

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

दैनिक बोंबाबोंबचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

हेही वाचा-

हे देखील वाचा