मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंविरुद्ध ‘पंगा क्वीन’ कंगनाने केलेली भविष्यवाणी, म्हणाली होती, ‘…तुझा घमंड तुटेल’

सध्या महाराष्ट्रातील राजकारणाचे वातावरण गढूळ झाले आहे. राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे पद संकटात आहे. त्यांचे जवळचे मंत्री एकनाथ शिंदे यांनी मोठे पाऊल उचलले आहे. त्यामुळे आता असे म्हटले जात आहे की, उद्धव ठाकरे हे आपल्या पदाचा राजीनामा देऊ शकतात. या सर्व राजकीय वातावरणात आता बॉलिवूड अभिनेत्री कंगना रणौत हिचा जुना व्हिडिओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे. या व्हिडिओत कंगना म्हणत आहे की, उद्धव ठाकरे यांचा घमंड तुटेल.

खरं तर ‘पंगा क्वीन’ कंगना रणौत (Kangana Ranaut) हिचा २०२०मधील एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. त्यावेळी अभिनेत्रीच्या ऑफिसची मुंबई महानगरपालिकेने तोडफोड केली होती. त्यावेळी अभिनेत्रीने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्यावर निशाणा साधत भविष्यवाणी केली होती, ती आता चांगलीच चर्चेत आहे. कंगनाने या व्हिडिओत म्हटले की, “उद्धव ठाकरे, तुला काय वाटते, तू माझा सूड घेतलास? आज माझे घर तुटले, उद्या तुझा घमंड मोडेल.” याशिवाय कंगना रणौतचा आणखी एक व्हिडिओ व्हायरल होत आहे, ज्यामध्ये ती म्हणताना दिसत आहे की, “जेव्हाही एखादा पुरुष एखाद्या महिलेचा अपमान करतो, तेव्हा त्याचे पतन निश्चितच होते.”

 

View this post on Instagram

 

A post shared by Kangana Ranaut (@kanganaranaut) 

कंगनाचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहे. या व्हिडिओवर नेटकरी प्रतिक्रियांचा जोरदार पाऊस पाडत आहेत. एका युजरने कमेंट करत लिहिले की, “एकदा कंगनाने म्हटले होते की, आज माझे घर तुटले आहे, उद्या तुझा घमंड मोडेल.” दुसऱ्या एका युजरने लिहिले की, “कंगना रणौतची भविष्यवाणी योग्य दिशेने जात आहे.” अशाप्रकारे इतर युजर्सही या व्हिडिओवर आपल्या वेगवेगळ्या प्रतिक्रिया देत आहेत.

महत्त्वाचं म्हणजे, बीएमसीने सन २०२०मध्ये कंगनाच्या मुंबई येथील एका ऑफिसवर जोरदार तोडफोड केली होती. त्यानंतर तिने बीएमसीविरुद्ध मुंबई उच्च न्यायालयात धाव घेत नुकसानभरपाई मागितली होती. याप्रकरणात न्यायालयाने कंगनाच्या बाजूने निकाल सुनावला होता. न्यायालयाने म्हटले होते की, बीएमसीने वाईट हेतूने हे पाऊल उचलले आणि कंगनाचे कार्यालय वाईट हेतूने उद्ध्वस्त केले. हे नागरिकांच्या हक्काच्याही विरोधात असल्याचे न्यायालयाने म्हटले आहे. न्यायालयाच्या निकालानंतर कंगना रणौतने ट्वीट केले होते की, “जेव्हा एखादी व्यक्ती सरकारच्या विरोधात उभी राहते आणि जिंकते, तेव्हा तो व्यक्तीचा विजय नसून लोकशाहीचा विजय असतो.”

कंगनाचे सिनेमे
कंगनाच्या सिनेमांबद्दल बोलायचं झालं, तर ती मे २०२२मध्ये प्रदर्शित झालेल्या धाकड या सिनेमात झळकली होती. त्यानंतर आता ती ‘तेजस’ या सिनेमात दिसणार आहे.

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

दैनिक बोंबाबोंबचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

हेही वाचा-

Latest Post