टेलिव्हिजन आणि चित्रपट अभिनेता मुकुल देव याची आज सर्वत्र ओळख आहे. त्याने अनेक भाषांमध्ये, अनेक चित्रपटात आणि मालिकांमध्ये काम केले आहे. त्याने हिंदीसोबत पंजाबी, बंगाली, मल्याळम, कन्नड, तमिळ आणि तेलुगू चित्रपटात काम केले आहे.
मुकुल याने १९९६ मध्ये ‘मुमकिन’ या मालिकेतून अभिनय क्षेत्रात पदार्पण केले. त्याने दूरदर्शनवरील कॉमेडी शो ‘एक से बढकर एक’ मध्ये देखील अभिनय केला होता. त्याने ‘कही दिया जले कही जिया’, ‘कहाणी घर घर की’ यांसारख्या अनेक चित्रपटात काम केले आहे. (Bollywood actor mukul dev story from beginning days career and unknown facts about him)
मुकुलने २००८ साली ‘कभी कभी प्यार कभी कभी यार’ या मालिकेत काम करून सगळ्यांचे मन जिंकून घेतले. याच वर्षी त्याने चित्रपटात देखील पदार्पण केले. त्याच्या चित्रपटसृष्टीतील करिअरची सुरुवात ‘दस्तक’ या चित्रपटातून झाली. या चित्रपटात त्याने एसीपी रोहित मल्होत्रा याची भूमिका निभावली होती. या पात्राला खूप लोकप्रियता मिळाली होती.
त्यानंतर त्याने ‘यमला पगला दीवाना’, ‘सन ऑफ सरदार’ आणि ‘आर राजकुमार’ यांसारख्या चित्रपटात काम केले. यासोबत त्याने ‘फियर फॅक्टर’ मध्ये होस्ट केले आहे.
ही गोष्ट कदाचित अनेकांना माहित नसेल की, मुकुल एका अभिनेत्यासोबतच एक पायलट देखील आहे. त्याने इंदिरा गांधी राष्ट्रीय उड्डान ऍकेडमीमधून पायलटचे शिक्षण घेतले आहे. त्यावेळी नोकरी नसल्यामुळे तो रिकामाच होता. त्यावेळी महेश भट्ट यांच्याशी त्याची भेट झाली. त्यांनी त्याला ‘दस्तक’ या चित्रपटात काम करण्याची संधी दिली.
मुकुलला प्रवास करणे, चित्रपट पाहणे, खेळणे, गाणी ऐकणे आणि पुस्तके वाचण्याची आवड आहे. त्याच्या व्यस्त आयुष्यातून वेळ काढून तो त्याचे हे सगळे छंद पूर्ण करत असतो.
दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…
हेही नक्की वाचा-
-Birthday: लग्नाआधी लिव्ह-इनमध्ये होती नेहा पेंडसे, तर दोन मुलींचा पिता आहे अभिनेत्रीचा पती
-टॅटूची शौकीन आहे व्हीजे बानी, ‘रोडीज’चे अनेक सीझन होस्ट करून बनलीय तरुणांच्या गळ्यातील ताईत
-दुःखद! कोरिओग्राफर शिवा शंकर यांचे निधन, बराच काळ चालू होता कोरोनाशी लढा