Wednesday, June 26, 2024

नसीरुद्दीन शाह यांनी मिळालेल्या अवॉर्डपासून बनवली आहेत दरवाजाची हँडल्स, काय आहे नेमके प्रकरण? लगेच वाचा

बॉलीवूड अभिनेता नसीरुद्दीन शाह सध्या त्यांच्या आगामी प्रोजेक्टपेक्षा त्याच्या वादग्रस्त वक्तव्यामुळे जास्त चर्चेत आहे. नसीरुद्दीन यांनी गेल्या काही दिवसांत अशी अनेक विधाने दिली आहेत, ज्यावरून खळबळ उडाली आहे. अशातच आता अभिनेत्याने नवीन खुलासे करून सर्वांनाच थक्क केले आहे. नसीरुद्दीन यांनी त्यांना मिळालेल्या पुरस्कारांचा कसा उपयोग केला हे सांगितले आहे.

नसीरुद्दीन शाह (naseeruddin shah) यांनी नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत पुरस्कारांबद्दल त्यांचे मत व्यक्त केले. यासाेबतच ते मिळालेल्या पुरस्कारांचं काय करतात? हेही त्यांनी सांगितले. खरे तर एका मुलाखतीदरम्यान, ज्येष्ठ अभिनेत्याला विचारण्यात आले की, तुम्हाला मिळालेल्या पुरस्कारांचा तुम्ही तुमच्या फार्महाऊसच्या दाराची हँडल तयार करण्यासाठी वापरता ही अफवा खरी आहे का? यावर नवाज हसले आणि सांगितले की, ‘मला या ट्रॉफींमध्ये काही किंमत दिसत नाही. सुरुवातीच्या दिवसांत जेव्हा मला ते मिळाले तेव्हा मी आनंदी होतो, परंतु नंतर माझ्याभोवती ट्रॉफींचा ढीग लागला. उशिरा का होईना माझ्या लक्षात आले की, हे पुरस्कार लॉबिंगचे परिणाम आहेत.

नसीरुद्दीन शाह पुढे म्हणाले, ‘त्यानंतर जेव्हा मला पद्मश्री आणि पद्मभूषण मिळाले, तेव्हा मला माझ्या दिवंगत वडिलांची आठवण आली, जे नेहमी माझ्या नोकरीबद्दल चिंतेत असायचे आणि म्हणायचे की, जर तुम्ही हे निरुपयोगी काम केले तर तुम्ही मूर्ख व्हाल.’ म्हणून, जेव्हा मी पुरस्कार घेण्यासाठी राष्ट्रपती भवनात गेलो, तेव्हा मी वर पाहिले आणि माझ्या वडिलांना विचारले की, ते हे सर्व पाहत आहेत का, ते हाेते आणि मला खात्री हाेती की, ते आनंदी आहेत, मला ते पुरस्कार मिळाल्याने आनंद झाला. मात्र, मला ही स्पर्धात्मक बक्षिसे परवडत नाहीत.

पुरस्कार देण्याच्या संकल्पनेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत नसीरुद्दीन शाह म्हणाले, ‘कोणताही अभिनेता ज्याने भूमिका साकारण्यासाठी जीव ओतला आहे तो चांगला अभिनेता आहे. जर तुम्ही अनेकांमधून एक व्यक्ती निवडणार आणि तो वर्षातील सर्वोत्कृष्ट अभिनेता आहे असे म्हणणार, तर ते कसे योग्य आहे? मला त्या पुरस्कारांचा अभिमान नाही. मला मिळालेले शेवटचे दोन पुरस्कार घ्यायला मी गेलो नाही. म्हणून, जेव्हा मी फार्महाऊस बांधले तेव्हा मी हे पुरस्कार तिथेच ठेवण्याचा निर्णय घेतला. जो कोणी वॉशरूममध्ये जाईल त्याला प्रत्येकी दोन पुरस्कार मिळतील, कारण हँडल फिल्मफेअर पुरस्कारांचे बनलेले आहेत. असे अभिनेत्याने मुलाखतीत सांगितले. (bollywood actor naseeruddin shah hangs his filmfare award on the handle of the washroom said i dont find any value)

दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
अक्षरा सिंगचे रोमँटिक गाणे ‘अखियां घायल करे’ रिलीज, अभिनेत्रीची स्टाइल पाहून चाहते थक्क

‘अॅनिमल’च्या सेटवरून रणबीर कपूरचा ‘ताे’ व्हिडिओ व्हायरल, चाहत्यांनी केल्या भन्नाट कमेंट

हे देखील वाचा