‘पायरेट्स ऑफ द कॅरिबियन’चा ‘जॅक स्पॅरो’ झाला बॉलीवूड अभिनेता, सोशल मीडियावर व्हिडीओ पोस्ट करत…


‘पायरेट्स ऑफ द कॅरिबियन’ चित्रपटात हॉलिवूड अभिनेता जॉनी डेपने जॅक स्पॅरोचे संस्मरणीय पात्र साकारले होते. स्थानिकच नव्हे तर जगभरातील लोकांना ही व्यक्तिरेखा खूप आवडली. आता नवाजुद्दीन सिद्दीकीही या भूमिकेत दिसला आहे. आश्चर्यचकित होऊ नका! वास्तविक, नवाजुद्दीनच्या एका चाहत्याने जॅक स्पॅरोच्या पात्राचा व्हिडिओ एडिट केला आहे, ज्यात आपण नवाजुद्दीनचा चेहरा पाहू शकतो. तसेच, अभिनेत्याने हा व्हिडिओ ट्विट करुन चाहत्यांचे आभार मानले आहेत.

नवाजुद्दीनच्या चाहत्याने शेअर केलेला हा व्हिडिओ इतरांनाही आवडला आहे. बऱ्याच वापरकर्त्यांनी यावर कमेंट्स केल्या आहेत. एक वापरकर्त्याने लिहले, ‘ग्रेट, पहिल्यांदा पाहिल्यावर मला खरोखरच तो तुम्ही आहात हे ओळखताच आले नाही’. दुसर्‍या वापरकर्त्याने लिहिले- ‘पाइरेट्स ऑफ वासेपुर!’. एका वापरकर्त्याने तर नवाजुद्दीनला या पात्रामध्ये पाहण्याची इच्छाही व्यक्त केली आहे. वापरकर्त्याने लिहिले, ‘सर, मी तुम्हाला या भूमिकेत पाहू इच्छितो’. एका वापरकर्त्याने नवाझुद्दीनला एक नवीन नाव दिले – ‘जॅक सिद्दिकी…हाहाहा!’ अशा बऱ्याच गंमतीदार कंमेट्स नवाजुद्दीनच्या पोस्टखाली पाहायला मिळाल्या.

नवाजुद्दीन सिद्दीकीच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचे झाले, तर अभिनेता लवकरच ‘जोगिरा सरारा’ चित्रपटाच्या शूटिंगला सुरुवात करणार आहे. कुशन नंदी दिग्दर्शित या चित्रपटात नवाजुद्दीनच्या विरुद्ध अभिनेत्री नेहा शर्मा दिसणार आहे. चित्रपटाचे शूटिंग 25 फेब्रुवारीपासून सुरू हाेईल. रिपोर्ट्सनुसार, चित्रपटाचे चित्रीकरण लखनऊमधील बाराबंकी येथे होणार आहे. याशिवाय रहीमाबाद आणि बनारसमध्येही चित्रपटाचे चित्रीकरण होणार आहे.

जोगिरा साराच्या व्यतिरिक्त नवाझुद्दीन ‘नो लँड्स मॅन’ आणि सेजल शहा यांच्या ‘अनटायटल्ड’ चित्रपटात काम करत आहे. गेल्या वर्षी लॉकडाऊन दरम्यान, नवाजुद्दीनची ‘रात अकेली है’ आणि ‘सीरियस मॅन’ हे दोन चित्रपट प्रदर्शित झाले. दोन्ही चित्रपट ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित करण्यात आले होते.

1999 मध्ये आमिर खानची मुख्य भूमिका असलेल्या सरफरोशपासून नवाजुद्दीन सिद्दीकीने बॉलिवूडमध्ये अभिनय करण्यास सुरूवात केली. त्यानंतर त्याने राम गोपाल वर्माच्या ‘शूल’, ‘जंगल’ आणि राजकुमार हिरानीच्या ‘मुन्ना भाई एमबीबीएस’ मध्ये काम केले. मुंबईत आल्यानंतर त्याने टीव्ही मालिकांमध्ये काम मिळवण्याचा प्रयत्न केला, पण त्याला फारसे यश मिळाले नाही. पण त्याला खरी ओळख अनुषा रिझवीच्या ‘पिपली लाइव्ह'(2010) मधुन मिळाली, ज्यात त्याने पत्रकाराची भूमिका साकारली होती.

दैनिक बोंबाबोंचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-अखेर गुड न्यूज आलीच.! करिना आणि सैफ दुसऱ्यांदा झालेत आई-बाबा; पाहा कोण आलंय जन्माला, युवराज की युवराज्ञी?

-सैफ अली खानवर फिदा होती परिणीती, तर ऋतिक रोशन होता ‘या’ अभिनेत्रीचा क्रश; जाणून घ्या बॉलिवड कलाकारांचे क्रश

-लव्ह, रिलेशनशीप आणि आत्महत्या…? जिया खानच्या मृत्यूचं आजवर न सुटलेलं कोडं!


Leave A Reply

Your email address will not be published.