रजनीकांत यांची मोठी मुलगी ऐश्वर्या रजनीकांत हिच्या लग्नातील दागिने त्यांच्या घरातून चोरीला गेल्याची बातमी समाेर येत आहे. यासंदर्भात ऐश्वर्याने चेन्नईच्या तेनमपेट पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली असून पोलिसांनी या प्रकरणी एफआयआर नोंदवून घेतली आहे. रजनीकांत यांच्या लेकीने तिच्या चेन्नईच्या घरातील 60 तोळे सोने आणि हिऱ्याचे दागिने गायब असल्याचा दावा केला आहे.
एफआयआरच्या प्रतीनुसार, ऐश्वर्याने दागिने लॉकरमध्ये ठेवले होते आणि तिच्या घरातील काही नोकरांना याची माहिती होती. तेनमपेट पोलिसांनी भादंवि कलम 381 अन्वये गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे. ऐश्वर्या रजनीकांत सध्या तिचा आगामी चित्रपट ‘लाल सलाम’च्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे. शूटिंगसाठी अभिनेत्री तामिळनाडूच्या वेगवेगळ्या शहरांना भेट देत आहे.
फेब्रुवारीमध्ये ऐश्वर्या रजनीकांतने दागिन्यांच्या चोरीची तक्रार तेनमपेट पोलीस ठाण्यात दाखल केली होती. तिच्या तक्रारीत तिने नमूद केले आहे की, तिने 2019 मध्ये तिचे दागिने शेवटचे पाहिले होते, जेव्हा तिने ते दागिने बहीण सौंदर्याच्या लग्नात घातले होती. लग्नानंतर तिने हे दागिने लॉकरमध्ये ठेवले होते.
2021 मध्ये लॉकर तीन ठिकाणी हलवण्यात आले. 21 ऑगस्ट 2021 रोजी, लॉकर इतर घरगुती वस्तूंसह तिचा एक्स पती धनुषच्या सीआयटी नगर येथील फ्लॅटमध्ये नेण्यात आले. नंतर सप्टेंबर 2021 मध्ये, ते सेंट मेरी रोड, चेन्नई येथील त्याच्या अपार्टमेंटमध्ये हलवण्यात आले आणि अखेरच एप्रिल 2022 मध्ये लॉकर त्याच्या पोस गार्डन्सच्या घरी आणण्यात आले, तर लॉकरच्या चाव्या सेंट मेरी रोड येथील त्याच्या फ्लॅटमध्ये होत्या.
10 फेब्रुवारी 2023 रोजी ऐश्वर्याने लॉकर उघडले तेव्हा, लग्नाच्या 18 वर्षानंतर तिने जमा केलेले काही दागिने गायब असल्याचे पाहून तिला धक्काच बसला. डायमंड सेट, जुने सोन्याचे तुकडे, नवरत्नम सेट, बांगड्या आणि सुमारे 60 तोळे सोने असा सुमारे 3.60 लाख रुपये किमतीचा ऐवज चोरून नेला. अशात ऐश्वर्याने घरातील नोकरांवर चाेरीचा संशय व्यक्त केला आहे.(bollywood actor rajinikanth daughter aishwarya rajnikanth jewelry missing police registers case and starts investigation)
दैनिक बाेंबाबाेंबचा व्हाॅटसऍप ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
अनुभव सिन्हा यांच्या सांगण्यावरून आशुतोष राणा यांनी रागाच्या भरात राजकुमाराला लगावली होती चापट
‘तो एका सामान्य माणसासारखे आयुष्य जगतो’ कास्टिंग दिग्दर्शक मुकेश छाबरा यांचा सलमान खानच्या राहणीमानाबद्दल खुलासा