Friday, April 19, 2024

हिट झालेल्या सिनेमाचे श्रेयही राजीव कपूर यांना मिळाले नाही, वडिल राज कपूर यांनीही दिली नव्हती साथ

दिवंगत अभिनेते ऋषी कपूर यांचे लहान भाऊ आणि अभिनेते राजीव कपूर यांचे वयाच्या 58 व्या वर्षी मंगळवारी निधन झाले आहे. हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने त्यांची प्राणज्योत मालवली. मंगळवारी सकाळी राजीव कपूर यांना हृदयविकाराचा झटका आल्याने त्यांना चेंबूरमधील Inlaks Hospital मध्ये दाखल करण्यात आले होते. पण दुर्दैवाने उपचारा दरम्यान त्यांचे निधन झाले.

शोमॅन राज कपूर यांचा सर्वात लहान मुलगा असलेले राजीव कपूर उर्फ चिंपू यांचे निधन झाले. रणधीर कपूर यांनी त्यांच्या भावाच्या निधनाची अधिकृत माहिती सोशल मीडियावरून पोस्ट करत दिली. त्यांनी त्यांच्या पोस्टमध्ये लिहिले, ” मी माझ्या लहान भावाला आज गमावले आहे. डॉक्टरांनी त्यांना वाचवण्याचे सर्व शर्थीचे प्रयत्न केले, मात्र ते यशस्वी झाले नाही.”

राजीव यांनी त्यांच्या अभिनयपेक्षाही जास्त नाव वैयक्तिक आयुष्यातील घटनांमुळे कमावले.  1983मध्ये ‘एक जान हैं हम’ या सिनेमातून त्यांनी हिंदी सिनेसृष्टीत एंट्री केली. मात्र त्यांना 1985 मध्ये आलेल्या ‘राम तेरी गंगा मैली’ या सिनेमाने ओळख मिळवून दिली. त्यांनी त्यांच्या करियरमध्ये केवळ 10/12 सिनेमांमध्ये काम केले होते.

त्यांचा ‘राम तेरी गंगा मैली’ चित्रपट प्रचंड गाजला, मात्र त्याच श्रेय देखील अभिनेत्री मंदाकिनीला मिळाले. त्यामुळे ते प्रचंड निराश झाले. त्यांची खूप चिडचिड सुरु झाली. एका मागो मग एक अनेक सिनेमे फ्लॉप झाल्यानंतर जेव्हा वडिल राज कपूर यांनी त्यांच्या नवीन चित्रपटात राजीव यांना घेण्याचे ठरवले तेव्हा ते प्रचंड खुश झाले.

त्यांना त्यांच्या वडिलांनी ‘राम तेरी गंगा मैली’ सिनेमात मुख्य भूमिका साकारण्यासाठी त्यांचे नाव नक्की केले. हा सिनेमा सुपरहिट झाला, मात्र याचा फायदा त्यांना झालाच नाही. त्यांचा हा एकमेव सिनेमा होता जो सुपरहिट झाला. त्यानंतर त्यांनी राज कपूर यांना अनेकदा त्याच्या चित्रपटात घेण्याची विनंती केली, पण राज कपूर यांनी कधीही विनंती मान्य केली नाही.

मनोरंजन क्षेत्रातील मनोरंजक बातम्यांसाठी आमचं टेलिग्राम चॅनेल जॉइन करा येथे क्लिक करा…

यामुळेच राजीव कपूर आणि राज कपूर यांच्यात दरी निर्माण झाली, आणि ती कधीच भरून निघाली नाही. आजही त्यांना फक्त राम तेरी गंगा मैली या सिनेमासाठीच ओळखले जाते. चित्रपट चालले नसल्याने त्यांनी २००१ मध्ये त्यांनी आर्किटेक्ट आरती सबारवाल यांच्याशी लग्न केले. पण हे लग्न यशस्वी झाले नाही. लग्नाच्या दोन वर्षांनंतर दोघांचा घटस्फोट झाला. राजीव यांनी दुसरे लग्न केले नाही. ते मोठे भाऊ रणधीर कपूर यांच्यासोबतच राहत होते. त्यांना मुलं देखील नाहीत.

हेही वाचा
शूटिंगदरम्यान राजीव कपूर पडले होते पद्मिनी कोल्हापुरेच्या प्रेमात; राज कपूर यांनी धमकी दिल्यावर तुटले होते दोघांचे नाते
‘या’ कारणामुळे राजीव यांचे वडील राज कपूरांसोबत बिघडले होते नाते; त्यांच्या अंत्यसंस्कारातही सामील नव्हते अभिनेते

हे देखील वाचा