Wednesday, December 6, 2023

‘जेलर’चे शूटिंग संपल्यानंतर तमन्नाला रजनीकांतकडून मिळाली ‘ही’ खास भेट, अभिनेत्रीने व्यक्त केला आनंद

दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील सुपरस्टार अशी ओळख असलेला अभिनेता रजनीकांतचा ‘जेलर’ चित्रपट गेल्या अनेक दिवसांपासून मीडियामध्ये चर्चेचा विषय आहे. दिग्दर्शक नेल्सन दिलीप कुमार दिग्दर्शित या चित्रपताचे शूटिंग नुकतेच पूर्ण झाले. अशा परिस्थितीत शूटिंगची मजा साजरी करण्यासाठी निर्मात्यांनी एक केक कट केला, ज्याचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले. या चित्रपटात रजनीकांत आणि तमन्ना भाटिया मुख्य भूमिकेत आहेत. अशात अभिनेत्रीने खुलासा केला की, ‘जेलर’चे शूटिंग पूर्ण केल्यानंतर रजनीकांतकडून तिला एक विशेष भेट देण्यात आले.

तमन्ना भाटिया (tamannaah bhatia) आणि रजनीकांत (rajnikanth) यांनी अखेर त्यांच्या आगामी ‘जेलर’ चित्रपटाचे शूटिंग पूर्ण केले आहे. हा चित्रपट 10 ऑगस्ट रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित होणार आहे. ही पहिलीच वेळ आहे, जेव्हा अभिनेत्री दिग्गज अभिनेत्यासोबत स्क्रीन स्पेस शेअर करताना दिसणार आहे आणि ते त्याच्या रिलीजची आतुरतेने वाट पाहत आहेत. अशात माध्यमाशी बातचीत करताना, तमन्ना भाटिया हिने ज्येष्ठ अभिनेत्यासोबत काम करण्याची संधी मिळाल्याबद्दल तिला किती भाग्यवान आणि धन्य वाटले याबद्दल सांगितले.

या चित्रपटात रजनीकांतसोबत काम केल्याबद्दल आनंद व्यक्त करताना तमन्ना म्हणाली, ‘रजनीकांतसोबत काम करणे हे स्वप्न पूर्ण झाल्यासारखे आहे. ‘जेलर’च्या सेटवर घालवलेले क्षण मी कायम लक्षात ठेवेल. त्यांनी मला आध्यात्मिक प्रवासाची पुस्तकेही भेट दिली आहेत.’ ‘जेलर’ हा नेल्सन दिलीप कुमार लिखित आणि दिग्दर्शित पूर्ण एक्शन एंटरटेनर फिल्म आहे, ज्यात रजनीकांत जेलरच्या भूमिकेत आहेत.

मोठ्या प्रमाणावर शूटिंग केल्यानंतर रजनीकांतने त्यांच्या ‘जेलर’ चित्रपटाचे शूटिंग शेड्यूल पूर्ण केले आहे. या चित्रपटात प्रियंका मोहन, शिवा राजकुमार, जॅकी श्रॉफ, राम्या कृष्णन, योगी बाबू, वसंत रवी, विनायकन आणि तमन्ना भाटिया दिसणार आहेत. अशात हा चित्रपट पाहण्यासाठी चाहते प्रचंड उत्साही आहेत.(bollywood actor rajnikanth tamannaah bhatia wraps film shoot actress gets gift from superstar calls it special)

दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
फ्लाेरल साडीत क्रिती सेनाॅनने लावले चार चांद, फाेटाे व्हायरल
‘काेई मिल गया’चा जादू आला परत, काेण आहे ही अभिनेत्री? ओळखा पाहू

हे देखील वाचा