Thursday, April 18, 2024

लग्नानंतर 11 वर्षांनी रामचरणच्या घरात चिमुकल्या बाळाचे आगमन, व्हिडिओ एकदा पाहाच

साऊथ स्टार राम चरण आणि त्याची पत्नी उपासना कामिनेनी सध्या त्यांच्या आयुष्यातील सर्वोत्तम वेळ एन्जॉय करत आहेत. खरे तर, 20 जून 2023 रोजी उपासना आणि राम चरण यांनी त्यांच्या पहिल्या बाळाचे स्वागत केले आहे. अभिनेत्रीने हैदराबादमधील रुग्णालयात एका मुलीला जन्म दिला आहे. अशात अभिनेत्याचा हॉस्पिटलमधील एक व्हिडिओ इंटरनेटवर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.

‘आरआरआर’ स्टार राम चरण (ram charan) आणि उपासना कामिनेनी (upasana kamineni ) यांनी त्यांच्या बाळाचे स्वागत केल्याची बातमी हैदराबादमधील अपोलो हॉस्पिटलने शेअर केली होती, जी राम चरणच्या फॅन क्लबनेही त्यांच्या इंस्टाग्रामवर शेअर केली आहे. या पाेस्टमध्ये लिहिले आहे की, “उपासना कमिनेनी कोनिडेला आणि रमचरण कोनिडेला यांना 20 जून रोजी कन्यारत्न प्राप्त झाले. बाळाचा जन्म हैद्राबादमधील अपोलो हॉस्पिटल जुबिली हिल्स येथे झाला असून बाळ व बाळाची आई दोघांची परिस्थिती सामान्य आहे.”

 

View this post on Instagram

 

A post shared by Ram Charan (@ram_konidela)

याआधी राम चरण आणि उपासना यांचा एक व्हिडिओ इंटरनेटवर व्हायरल झाला होता, ज्यामध्ये दोघांच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहून ते त्यांच्या आयुष्याचा हा नवा अध्याय सुरू करण्यासाठी किती उत्सुक आहेत हे स्पष्ट दिसत होते.

 

View this post on Instagram

 

A post shared by Ram Charan (@ram_konidela)

याआधी सुपरस्टार चिरंजीवी यांनी त्यांची सून उपासनाच्या प्रेग्नंसीची बातमी त्यांच्या चाहत्यांशी शेअर केली होती. कुटुंबाचा आनंद व्यक्त करत त्यांनी आपल्या ट्विटमध्ये लिहिले, “हनुमानजींच्या कृपेने, आम्हाला हे सांगताना खूप आनंद होत आहे की, उपासना आणि राम चरण लवकरच त्यांच्या पहिल्या बाळाचे स्वागत करणार आहेत. खूप प्रेम आणि कृतज्ञता.”

 

View this post on Instagram

 

A post shared by Ram Charan (@alwaysramcharan)

2023 ची सुरुवात रामचरणसाठी खूप चांगली झाली आहे. या वर्षाच्या सुरुवातीला त्याच्या ‘आरआरआर’ या चित्रपटाचे जागतिक स्तरावर कौतुक झाले आहे.(bollywood actor ram charan and wife upasana kamineni welcome a baby girl after 11 years of marriage )

अधिक वाचा-
प्रसिद्ध कोरिओग्राफरचे निधन, वयाच्या 53व्या वर्षी ‘या’ गंभीर आजाराचे झाले शिकार
28 वर्षांनी लहान अवनीतसोबतच्या किसिंग सीनबद्दल नवाजुद्दीनने दिले स्पष्टीकरण; म्हणाला, ‘शाहरुख खान …’

हे देखील वाचा