Wednesday, July 3, 2024

घटस्फाेटाच्या चर्चादरम्यान रणवीरचा प्रियांकासाेबतचा ‘ताे’ व्हिडिओ व्हायरल; चाहते म्हणाले, ‘देसी गर्ल…’

बॉलिवूड आणि हॉलिवूड अभिनेत्री प्रियांका चोप्रा सध्या भारतात आहे. अभिनेत्रीने शुक्रवारी (दि. 31 मार्च)ला सकाळी पती निक आणि मुलगी मालतीसोबत मुंबई विमानतळावर पोहोचून सर्वांना आश्चर्यचकित केले. प्रियंका जेव्हापासून भारतात परतली आहे, तेव्हापासून ती अंबानी कुटुंबाच्या ‘नीता मुकेश अंबानी कल्चरल सेंटर’ च्या लॉन्चिंग साेहळ्यात दिसली.

शनिवारी, कार्यक्रमाच्या दुसऱ्या दिवशी, प्रियांकाने पती निक जोनाससाेबत कार्यक्रमाला उपस्थिती लावली. मल्टी कलर आउटफिटमध्ये प्रियांका चोप्रा खूपच सुंदर दिसत होती. या सुंदर कल्चरल सेंटरच्या लॉन्चिंग इवेंटचे अनेक व्हिडिओ आणि फोटो समोर येत आहेत.

अशात अलीकडेच प्रियांका चोप्राचा एक नवीन व्हिडिओ समोर आला आहे, ज्यामध्ये ती तिचा सहकलाकार आणि प्रसिद्ध अभिनेता रणवीर सिंगसोबत ‘दिल धडकने दो’ या चित्रपटातील ‘गल्लां गूड़ियां’ गाण्यावर डान्स करताना दिसत आहे. या कार्यक्रमानिमित्त जवळपास दोघेही 8 वर्षांनंतर एकत्र दिसले आहेत. रणवीर आणि प्रियांका शेवटचे ‘बाजीराव मस्तानी’ या चित्रपटात दिसले होते. हा चित्रपट 2015 च्या शेवटी प्रदर्शित झाला होता.

 

View this post on Instagram

 

A post shared by Viral Bhayani (@viralbhayani)

प्रियांकाला इतक्या वर्षांनंतर भारतात स्टेजवर परफॉर्म करताना पाहून तिचे चाहते खूप खूश आहेत. युजर्स प्रियांका आणि रणवीरचे जोरदार कौतुक करत आहेत. एका युजरने कमेंट करत लिहिले की, ‘या व्हिडिओसाठी धन्यवाद. या गाण्यावर प्रियांकाने बऱ्याच दिवसांनी डान्स केला.’, तर दुसरा चाहता म्हणाला,’स्टेजवर देसी गर्लचे पुनरागमन.’

प्रियांका चोप्राच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचे झाले तर, अभिनेत्री लवकरच रुसो ब्रदर्सच्या अॅक्शन वेब सीरिज ‘सिटाडेल’मध्ये काम करताना दिसणार आहे. याचा प्रीमियर 28 एप्रिल 2023 रोजी अॅमेझाॅन प्राईम व्हिडिओवर होईल. यासह प्रियांका लवकरच बॉलिवूडमध्ये ‘जी ले जरा’या चित्रपटाद्वारे पुनरागमन करणार आहे. या चित्रपटात प्रियांका व्यतिरिक्त आलिया भट्ट आणि कॅटरिना कैफ मुख्य भूमिकेत आहे.(bollywood actor ranveer singh and actre`s`s priyanka chopra great dance on gallan gudiyan)

दैनिक बाेंबाबाेंबचा व्हाॅटसऍप ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
‘नाटू- नाटू’ गाण्यावर बाॅलिवूडसह टाॅलिवूडच्या ‘या’ प्रसिद्ध अभिनेत्रीने लावले ठूमके, तर पठाणने दिली आयकॉनिक पोज

अजय देवगणच्या ३० वर्षाच्या मोठ्या कारकिर्दीत अभिनेता झाला होता ‘या’ अभिनेत्रींच्या प्रेमात वेडा

हे देखील वाचा