केंद्रीय मंत्री स्मृती इराणी सध्या देशाच्या महिला आणि बालविकास मंत्रालयाची जबाबदारी पार पाडत आहेत. मात्र, त्याआधी त्यांनी टीव्हीच्या दुनियेत खूप नाव कमावलं. ‘क्यूंकी सास भी बहू थी‘ या टीव्ही सीरियलमधून त्यांनी ‘तुलसी’ या नावाने घराघरात लोकप्रियता मिळवली. अलीकडेच स्मृती इराणीने खुलासा केला आहे की, त्यांच्या अभिनय कारकिर्दीत त्यांना अनेकदा पान मसाल्याच्या जाहिरातींची ऑफर देण्यात आली होती, पण अभिनेत्रीने ती स्वीकारली नाही.
एका मुलाखतीत स्मृती इराणी (smriti zubin irani) यांनी सांगितले की, “जेव्हा त्यांचे लग्न झाले, तेव्हा त्यांच्याकडे पैसे नव्हते. त्यांनी घर घेण्यासाठी बँकेकडून कर्ज घेतले होते.” स्मृती इराणी पुढे म्हणाल्या, “मला आठवते मी प्रवास सुरू केला, तेव्हा माझ्याकडे काहीही शिल्लक नव्हते… माझे नवीन लग्न झाले होते आणि माझ्या बँक खात्यात 20-30 हजार रुपयेही नव्हते आणि मला घर घ्यायचे होते.”
ही ऑफर बँकेच्या कर्जापेक्षा 10 पट अधिक होती
स्मृती इराणी पुढे सांगतात की, “मी घरासाठी सुमारे 25-27 लाख रुपयांचे कर्ज घेतले होते आणि हे कर्ज फेडणे माझ्यासाठी खूप कठीण होते. यादरम्यान मला ‘पान मसाला जाहिरात’ करण्याची ऑफर मिळाली. पैसे माझ्या बँक बॅलन्सच्या दहापट होते. मात्र, मी त्याला नकार दिला.”
View this post on Instagram
स्मृती इराणी यांनी पुढे पान मसाल्याची जाहिरात नाकारण्याचे कारण सांगितले. त्या म्हणाला, “मला माहित होते की, मला कुटुंब पाहत आहे, तरुण पाहत आहेत आणि मला असे वाटले की, मी त्यांच्या कुटुंबाचा एक भाग आहे, ते मला पाहत आहेत मग असे अचानक पान मसाला विकणे मला पटले नाही आणि म्हणून मी प्रामाणिकपणे नाही म्हणाली.” असे स्मृती इराणी यांनी मुलाखतीदरम्यान सांगितले.(tv actress smriti zubin irani rejected pan masala advertisement offer revealed reason
अधिक वाचा-
–हेमा मालिनी नव्हे तर ‘या’ अभिनेत्रीच्या सौंदर्याने लावले होते अभिनेते संजीव कुमार यांना वेड
–आमिर खानची लाडकी लेक झाली हाेती डिप्रेशनची शिकार; म्हणाली, ‘संपूर्ण कुटुंबाला…’