१५ ऑगस्ट हा प्रत्येक भारतीयासाठी खूप खास आहे. ब्रिटिश राजवटीपासून ७५ वर्षे पूर्ण झाल्याचा सोहळा सर्वत्र साजरा होत आहे. बॉलिवूडमधूनही अशी काही छायाचित्रे व्हायरल होत आहे, ज्यात स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाची झलक पाहायला मिळत आहे.
बॉलीवूडमधील प्रसिद्ध अभिनेता सलमान खान (Salman Khan)आईएनएस विशाखापट्टणममध्ये जाऊन भारतीय नौदलाच्या जवानांची भेट घेतली आहे. सैनिकांसोबतचे सलमानचे फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. यावेळी सलमाननं सैनिकांसोबत संवाद साधला. तसेच त्यांनं आईएनएस विशाखापट्टणम ही युद्धनौका पाहिली. तसेच त्यानं यावेळी सैनिकांसोबत पुशअप्स मारले, कूकिंग केलं आणि वर्कआऊट देखील केला. सलमाननं आईएनएस विशाखापट्टणमवर तिरंगा फडकवला. उपस्थित सैनिकांनी सलमानचा ऑटोग्राफ देखील घेतला. सैनिकांची देशभक्ती आणि धैर्य पाहून सलमान भारावून गेला.
आईएनएस विशाखापट्टणममध्ये ३१२ लोकांचा क्रू आहे आणि ४००० नॉटिकल मैलांचा वेग गाठू शकतो. ४२ दिवसांचे मिशन एकाच वेळी पूर्ण करू शकतो.आयएनएस विशाखापट्टनम १६३ मीटर लांब आणि ७४०० टन वजनाची आहे. यामध्ये सर्फस टु एअर मिसाईल, ब्रह्मोस, टोरपीडो ट्यूब लॉचर, अँटी सबमरीन रॉकेट लॉचर, बीएचईएलची ७६ एमएम सुपर रॅपिड सारखी हत्यारे आहेत. आता भारतीय नौदलात १३० युद्ध नौका आहेत. विशाखापट्टणम या युद्धनौकेची बांधणी स्वदेशी बनावटीच्या डीएमआर २४९ ए स्टीलचा वापर करून केली आहे. भारतात बांधण्यात आलेली ती सर्वात मोठी युद्धनौका आहे.
लवकरच सलमानचे काही आगामी चित्रपट हे प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहेत. ‘कभी ईद कभी दिवाली’, ‘टायगर-३’ या सलमानच्या आगामी चित्रपटांची वाट सलमानचे चाहते उत्सुकतेने पाहात आहेत. टायगर-३ हा चित्रपट पुढच्या वर्षी रिलीज होणार आहे.
आमिर खान आसाममध्ये जाऊन स्वातंत्र्याचा उत्सव साजरा करणार आहे
आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा यांनी आमिर खानला स्वातंत्र्याची ७५ वर्षे पूर्ण झाल्याच्या सोहळ्याला उपस्थित राहण्याचे निमंत्रण दिले आहे. माध्यमाच्या वृत्तानुसार, आमिर त्याच्या लाल सिंग चड्डाच्या टीमसोबत ध्वजारोहण सोहळ्याला उपस्थित राहणार आहे. आसामचे मुख्यमंत्रीही दुसऱ्या दिवशी ‘लाल सिंग चड्ढा’ चित्रपट पाहणार आहेत. हा चित्रपट आज ११ ऑगस्ट रोजी चित्रपटगृहात प्रदर्शित झाला आहे. अद्वैत चंदन दिग्दर्शित लाल सिंग चड्ढा हा हॉलिवूड चित्रपट फॉरेस्ट गंपचा अधिकृत रिमेक आहे आणि या चित्रपटात करीना कपूर खान मुख्य भूमिकेत आहे.
दैनिक बोंबाबोंबचा व्हॉट्सऍप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बोंबाबोंबचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
अधिक वाचा-
रक्षाबंधन स्पेशल! भाऊ बहिणींचे सुंदर नाते दाखवणारे ‘हे’ चित्रपट पाहाच
अभिनेत्री तब्बूचा सेटवर झाला अपघात; अॅक्शन सीन शूट करताना डोळ्याला झाली गंभीर दुखापत
दिशा पटानीसोबतच्या ब्रेकअपनंतर ‘या’ अभिनेत्रीला डेट करतोय टायगर श्रॉफ, नात्याबद्दल केला खुलासा