Friday, March 29, 2024

दिशा पटानीसोबतच्या ब्रेकअपनंतर ‘या’ अभिनेत्रीला डेट करतोय टायगर श्रॉफ, नात्याबद्दल केला खुलासा

बॉलिवूड अभिनेता टायगर श्रॉफ (Tiger Shroff) सध्या दिशा पटानी (Disha Patani)सोबतच्या ब्रेकअपच्या बातम्यांमुळे खूप चर्चेत आहे. टायगर आणि दिशा खूप दिवसांपासून एकमेकांना डेट करत होते आणि अनेकदा एकत्र स्पॉट झाले होते. मात्र, दोघेही त्यांच्या नात्याबद्दल फारसे बोलले नाहीत. पण आता टायगर पुन्हा एकदा त्याच्या लव्ह लाईफमुळे चर्चेत आला आहे. दिशानंतर टायगरच्या आयुष्यात एका सुंदर महिलेचा प्रवेश झाल्याचे बोलले जात आहे.

टायगर श्रॉफ आणि दिशा पटानी यांच्या प्रेमप्रकरणाची अनेक महिन्यांपासून सोशल मीडियावर चर्चा रंगली होती. परंतु अलिकडेच दोघांचेही ब्रेकअप झाल्याची बातमी समोर आली. ज्यामुळे त्यांच्या चाहत्यांमध्ये रंगली होती.  रिपोर्ट्सनुसार, दिशा पटानीसोबत ब्रेकअप झाल्यानंतर टायगर श्रॉफ अभिनेत्री आकांक्षा शर्माला डेट करत आहे. आकांक्षा शर्मा टायगरसोबत ‘कसानोव्हा’ आणि ‘आय एम अ डिस्को डान्सर 2.0’ च्या म्युझिक व्हिडिओमध्ये दिसली आहे. त्यांच्या अफेअरच्या बातम्या वेगाने पसरत आहेत. मात्र, टायगरला या दोघांच्या नात्याबद्दल विचारले असता, त्याने हे खरे नसल्याचे सहज सांगितले.

दिशा पटानीसोबतच्या ब्रेकअपच्या वृत्तावर टायगरने काहीही सांगितले नाही. आकांक्षासोबतच्या अफेअरचे वृत्त त्याने नुकतेच फेटाळून लावले. आकांक्षाबद्दल बोलायचे तर तिने 2020 मध्ये साऊथच्या ‘त्रिविक्रम’ चित्रपटातून तिच्या करिअरची सुरुवात केली. याशिवाय ती वरुण धवन आणि महेश बाबूसोबत जाहिरातींमध्येही दिसली आहे.

टायगर श्रॉफ आणि दिशा पटानीबद्दल असे बोलले जात होते की, दोघेही बराच काळ एकत्र होते, त्यामुळे दिशाला आता लग्न करायचे होते. पण टायगर लग्नासाठी तयार नाही, त्यामुळे दोघे वेगळे झाले. मात्र, दोघांनीही यावर कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही. टायगरने नुकत्याच प्रदर्शित झालेल्या ‘एक व्हिलन रिटर्न्स’साठी दिशाचे अभिनंदनही केले.

हेही वाचा –

सुबोध भावेंच्या हस्ते ‘टकाटक २’चा उत्कंठावर्धक ट्रेलर लाँच, अभिनेत्रींच्या बिकीनी लूकवर खिळल्या नजरा

सोनी मराठी वाहिनीवरील ‘गाथा नवनाथांची’ मालिकेतील कलाकारांची सासवडच्या कानिफनाथ मंदिराला भेट!

‘तु ज्ञान पाजळू नकोस…’ स्वरा भास्करवर संतापले नेटकरी, पाहा काय आहे प्रकरण

हे देखील वाचा