Monday, July 1, 2024

सलमानचा शाहरुखच्या बायकाेसाेबतचा ‘ताे’ व्हिडिओ व्हायरल; चाहते म्हणाले, ‘सल्लू भाई…’

नीता मुकेश अंबानी कल्चरल सेंटरचा उद्घाटन सोहळा दोन दिवस मुंबईत चालला. या खास साेहळ्यात बॉलिवूडपासून ते हॉलिवूडपर्यंतचे सेलिब्रिटी सामिल झाले हाेते. यावेळी सर्व सेलिब्रिटी खास लूकमध्ये दिसले. बॉलिवूडचा दबंग खानही या कार्यक्रमाचा भाग हाेता. जिथे त्याच्या एन्ट्रीने सगळ्यांची मनं जिंकली. भाईजान सलमानच्या खास स्टाइलने चाहत्यांना वेड लावले. याशिवाय शाहरुख खानची पत्नी गौरी खान, सुहाना खान आणि आर्यन खानही या कार्यक्रमात सहभागी झाले होते. यावेळी सलमान खानने शाहरुखच्या कुटुंबासोबत पोजही दिल्या. ज्यांचा सोशल मीडियावर बोलबाला आहे.

NMACC च्या उद्घाटन कार्यक्रमाच्या दुसऱ्या दिवशी सलमान खान (salman khan) याने शानदार एन्ट्री केली. यावेळी अभिनेता ब्लॅक शर्ट, ऑलिव्ह ग्रीन ब्लेझर आणि मॅचिंग पँटमध्ये दिसला. या लूकमध्ये अभिनेता खूपच देखना दिसत होता. एंट्री घेतल्यानंतर सलमान खानने पॅपराझींसाेबत पोजही दिल्या, ज्याला पाहून अभिनेत्याचे चाहते खुप खूश झाले आहेत.

 

View this post on Instagram

 

A post shared by Viral Bhayani (@viralbhayani)

पॅपराझींसाेबत पोज दिल्याबद्दल सर्वजण सलमान खानचे कौतुक करत असून त्याच्यावर प्रेमाचा वर्षाव करत आहेत. एका युजरने या व्हिडिओवर कमेंट करत ‘बॉलिवुड का बाप’ अशी कमेंट केली, तर दुसऱ्याने ‘हीरो तो अब आया है’ असे लिहिले. अशात एक चाहता म्हणाला, ‘गोल्डन हार्ट सल्लू’.

 

View this post on Instagram

 

A post shared by Viral Bhayani (@viralbhayani)

गौरी खानही आपल्या मुलांसोबत या खास कार्यक्रमाचा भाग बनली. इव्हेंटच्या पहिल्या दिवशी सलमान खानने एंट्री गेटवर शाहरुखच्या फॅमिलीसोबत पोजही दिली. ज्यांचे फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहेत. पॅपराझी अकाऊंटने त्याच्या सोशल मीडिया अकाउंटवर हा व्हिडिओ शेअर केला आहे.(bollywood actor salman khan took a photo with the paparazzi the fans said hero has come now)

दैनिक बाेंबाबाेंबचा व्हाॅटसऍप ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
‘नाटू- नाटू’ गाण्यावर बाॅलिवूसह टाॅलिवूडच्या ‘या’ प्रसिद्ध अभिनेत्रीने लावले ठूमके, तर पठाणने दिली आयकॉनिक पोज

अजय देवगणच्या ३० वर्षाच्या मोठ्या कारकिर्दीत अभिनेता झाला होता ‘या’ अभिनेत्रींच्या प्रेमात वेडा

हे देखील वाचा