Thursday, April 18, 2024

ईदच्या दिवशी शाहरुखची एक झलक पाहण्यासाठी कडक उन्हात मन्नतच्या बाहेर जमले चाहते, व्हिडिओ व्हायरल

शनिवारी 22 एप्रिल रोजी जगभरात ईद साजरी केली जात आहे. त्यामुळे शाहरुख खानचे चाहते दरवर्षीप्रमाणे यावर्षीही मुंबईतील त्याच्या मन्नत या निवासस्थानाबाहेर अभिनेत्याची एक झलक पाहण्यासाठी जमले होते. शाहरुख खानच्या पठाण या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर चांगला व्यवसाय केला आहे. त्यामुळे ही ईद चाहत्यांसाठी खास आहे.

सकाळपासूनच शाहरुख खान याच्या घराबाहेर चाहत्यांची गर्दी होऊ लागली. गर्दीवर नियंत्रण ठेवण्यासाठी पोलीस बंदोबस्तही तैनात करण्यात आला हाेताे. अशात अलीकडेच शाहरुख खाननेही पठाणच्या यशाबद्दल एका संभाषणात जनता दर्शन बद्दल सांगितले. तो म्हणाला, ‘माझ्या वडिलधाऱ्यांनी मला असे सांगितले आहे की, जर तू दु:खी असेल तर त्या लाेकांकडे जा जे तुझ्यावर प्रेम करतात.’

 

View this post on Instagram

 

A post shared by Viral Bhayani (@viralbhayani)

शाहरुख खान पुढे म्हणाला, ‘प्रत्येकाच्या आयुष्यात काही ना काही वाईट घडते. जीवन असेच आहे. कधी चांगले दिवस येतील, तर कधी वाईट दिवस. प्रत्येकाचेच वाईट दिवस येतात, पण मी स्वतःला भाग्यवान समजतो की, माझ्यावर प्रेम करणारे लाखो चाहते आहेत. जेव्हा मी दुःखी असतो तेव्हा मी माझ्या बाल्कनीत जातो आणि जेव्हा मी आनंदी असतो तेव्हा मी माझ्या बाल्कनीत जातो. देवाने मला इतकं दिलंय की, माझ्याकडे कायम बाल्कनीचं तिकीट आहे.’

 

View this post on Instagram

 

A post shared by Shah Rukh Khan (@iamsrk)

पठाणच्या यशानंतर शाहरुख खानने आता स्वत:ला ‘जवान’साठी तयार केले आहे. ऍटली या चित्रपटाचे दिग्दर्शन करत आहेत. चित्रपटात नयनतारा आणि विजय सेतुपती यांच्याही महत्त्वाच्या भूमिका आहेत. त्याचबरोबर सान्या मल्होत्रा ​​आणि सुनील ग्रोव्हर देखील या चित्रपटात दिसणार आहेत. अलीकडेच शाहरुख खान आणि दीपिका पदुकोण मुंबईत एका गाण्यासाठी शूटिंग करताना दिसले.(bollywood actor shah rukh khan eid video fans gather outside mannat amid scorching heat to catch a glimpse of pathaan actor goes viral)

दैनिक बोंबाबोंबचा व्हॉट्सऍप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बोंबाबोंबचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
‘माझ्यापासून लांब राहायचे’ म्हणत जया बच्चन यांचा पुन्हा चढला पारा, रागात पापाराझींना दिली धमकी
आलियाची चप्पल उचलातानाचा रणबीरचा ‘ताे’ व्हिडिओ व्हायरल; साेशल मीडिया युजर्स म्हणाले…

हे देखील वाचा