Saturday, December 7, 2024
Home बॉलीवूड आलियाची चप्पल उचलातानाचा रणबीरचा ‘ताे’ व्हिडिओ व्हायरल; साेशल मीडिया युजर्स म्हणाले…

आलियाची चप्पल उचलातानाचा रणबीरचा ‘ताे’ व्हिडिओ व्हायरल; साेशल मीडिया युजर्स म्हणाले…

बॉलिवूड गायिका, निर्माती आणि पटकथा लेखक पामेला चोप्रा यांचे गुरुवारी वयाच्या 74 व्या वर्षी निधन झाले. त्यांच्या निधनाच्या बातमीने संपूर्ण इंडस्ट्रीत शोककळा पसरली आहे. दरम्यान, रणबीर कपूर आणि आलिया भट्टसह अनेक बॉलिवूड सेलिब्रिटी त्यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी त्यांच्या घरी हजेरी लावली. यादरम्यान दोघांचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. व्हिडिओमध्ये आलिया- रणबीर आदित्य चाेप्राच्या घरात प्रवेश करताना दिसत आहे.

खरे तर, घरात प्रवेश करण्यापूर्वी आलिया भट्ट (alia bhatt) दाराबाहेर चप्पल काढताना दिसली. मात्र, आलिया आत जाताच रणबीर कपूरने लगेच आलियाचे चप्पल उचलली आणि आत ठेवली. यानंतर तो आलियासह आदित्य चोप्राच्या घरी गेला. आलियासाठी रणबीरच्या हावभावावर साेशल मीडिया युजर्स प्रेमाचा वर्षाव करत आहेत.

एका युजरने लिहिले की, “या जोडप्याबद्दल आदर विशेषत: रणबीरबद्दल, तो वयस्करांच्या अंत्यसंस्कारांना जमेल तितक्या प्रमाणात उपस्थित राहतो”, तर दुसर्‍याने लिहिले, “रणबीर, या हावभावासाठी तुझ्यावर प्रेम आहे.” काही साेशल मीडिया युजर्सने याला पब्लिसिटी स्टंट देखील म्हटले आहे, तर जोडप्याच्या चाहत्यांनी रणबीरच्या उत्स्फूर्त हावभावाचे कौतुक केले.

 

View this post on Instagram

 

A post shared by Viral Bhayani (@viralbhayani)

रणबीर कपूर आणि आलिया भट्ट यांनी 14 एप्रिल रोजी त्यांच्या लग्नाचा पहिला वाढदिवस साजरा केला. अशात अलीकडेच हे जोडपे मुंबईतील त्यांच्या बांधकामामधीन घराचे काम तपासताना दिसले. 2022मध्ये लग्न करण्याव्यतिरिक्त, या जोडप्याने त्यांच्या पहिल्या बाळाचे म्हणजेच राहाचे स्वागत केले.

 

View this post on Instagram

 

A post shared by Alia Bhatt ???? (@aliaabhatt)

आलिया भट्टच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचे झाले तर, अभिनेत्री लवकरच चित्रपट निर्माता फरहान अख्तरच्या ‘जी ले जरा’ या चित्रपटात दिसणार आहे. या चित्रपटात तिच्याशिवाय प्रियांका चोप्रा आणि कॅटरिना कॅफ देखील मुख्य भूमिकेत आहेत.( Bollywood actor ranbir kapoor wins hearts as he picks wife alia bhatt chappals while visiting bereaved aditya chopra watch )

दैनिक बोंबाबोंबचा व्हॉट्सऍप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बोंबाबोंबचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
‘हे’ सुपरस्टार आजही करतात शेती, कलाकार म्हणतो की, ‘शेण उचलल्याशिवाय दिवस सुरू होत नाही….,’

तामिळ परिवारात जन्मूनही अस्खलित मराठी बोलणाऱ्या सुमित राघवनने भूतदया दाखवत घेतले चक्क वाघालाच दत्तक

author avatar
Team Bombabomb

हे देखील वाचा