Saturday, June 15, 2024

पठाणच्या गाण्यावर दिल्ली युनिव्हर्सिटीच्या प्रोफेसरने केला डान्स, बाॅलिवूडच्या किंग खाननेही केले कौतुक

शाहरुख खानच्या ‘पठाण‘ या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर चांगले यश मिळवले आहे. देशासोबतच परदेशातही हा चित्रपट प्रेक्षकांच्या पसंतीस उतरत आहे. अशात आता पठाणशी संबंधित एक व्हिडिओ सोशल मीडियावर माेठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे, ज्यामध्ये दिल्ली विद्यापीठाचे प्राध्यापक डान्स करताना दिसत आहेत. ज्यावर खुद्द शाहरुख खानने प्रतिक्रिया दिली आहे.

सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या या व्हिडिओमध्ये जीसस अॅन्ज मैरी कॉलेजचे विद्यार्थी आणि प्राध्यापक एकत्र नाचताना दिसत आहेत. या व्हिडिओला इंस्टाग्रामवर लाखो व्ह्यूज मिळाले आहेत. जेव्हा शाहरुख खानने हा व्हिडिओ पाहिला तेव्हा तो देखील त्यांचे कौतुक करण्यापासून स्वतःला रोखू शकला नाही. ट्विटरवर व्हिडिओ शेअर करताना किंग खान म्हणाला, “आम्ही किती नशीबवान आहोत की, शिक्षक आणि प्राध्यापक आम्हाला शिकवण्यासोबतच आमच्यासोबत मजाही करतात. तुम्ही सगळे शिक्षणाचे रॉकस्टार आहात.”

व्हिडिओमध्ये, सुरुवातीला विद्यार्थी पठाणच्या ‘झूम जो पठाण’ या टायटल गाण्यावर नाचताना दिसत आहेत, तर थोड्या वेळाने काही प्राध्यापक या डान्समध्ये सामील हाेऊन शाहुरख खानच्या हुक स्टेपवर धमाकेदार पद्धतीने सादर करताना दिसत आहेत.

पठाणच्या बॉक्स ऑफिस कलेक्शनबद्दल बोलायचं, तर या चित्रपटाने धमाकेदार कमाई केली आहे. 25 जानेवारीला रिलीज झालेल्या या चित्रपटाने पहिल्याच दिवशी 50 कोटींहून अधिक कमाई केली होती. त्याचवेळी पठाणने बॉक्स ऑफिसवर मंगळवारी (दि. 21 फेब्रुवारील)ला  27 दिवस पूर्ण केले आहेत. अशात चित्रपटाच्या डोमेस्टिक बॉक्स ऑफिस नेट कलेक्शनने 500 कोटींचा आकडा पार केला आहे. याशिवाय जगभरात पठाणचे नवे विक्रमही नोंदवले जात आहेत. 20 फेब्रुवारीपर्यंत, पठाणने जगभरात 1000 कोटींहून अधिक कमाई केली असून या चित्रपटाची कमाई अजूनही सुरूच आहे.(bollywood actor shah rukh khan reacts on du professors dance video on jhoome jo pathaan)

दैनिक बाेंबाबाेंबचा व्हाॅटसऍप ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
‘…तुम्हाला त्याचा राग येता कामा नये’ गीतकार जावेद अख्तर यांनी पाकिस्तानमध्ये जाऊन लोकांना दाखवला आरसा

‘सोनू निगम’सोबत झालेल्या भांडणावर स्वप्नीलच्या बहिणीचा मोठा खुलासा, सांगितले घटनेचे सत्य

हे देखील वाचा