Friday, June 13, 2025
Home बॉलीवूड माेठी बातमी! शूटिंगदरम्यान शाहरुख खानचा अपघात; अभिनेता गंभिररित्या जखमी

माेठी बातमी! शूटिंगदरम्यान शाहरुख खानचा अपघात; अभिनेता गंभिररित्या जखमी

बाॅलिवूड अभिनेता शाहरुख खान नुकताच अमेरिकेतील लॉस एंजेलिसमध्ये शूटिंगसाठी गेला होता, जिथे त्याचा अपघात झाला. अपघातानंतर अभिनेत्यावर शस्त्रक्रियाही करावी लागली. खरे तर, शाहरुखच्या नाकाला दुखापत झाल्याने रक्तस्त्राव सुरू झाला, ज्यानंतर त्याचे किरकोळ ऑपरेशन करावे लागले.

माध्यमातील वृत्तांनुसार, शाहरुख खान (shah rukh khan) लॉस एंजेलिसमध्ये एका प्रोजेक्टसाठी शूटिंग करत होता, जिथे शुटींगदरम्यान त्याच्या नाकाला दुखापत झाली आणि त्यांच्या नाकातून रक्तस्त्राव सुरू झाला, ज्यामुळे अभिनेत्याला तातडीने रुग्णालयात नेण्यात आले. डॉक्टरांनी त्याच्या टीमला सांगितले की, ‘काळजी करण्यासारखे काही नाही. रक्तस्त्राव थांबवण्यासाठी किरकोळ शस्त्रक्रिया करावी लागेल.’ ऑपरेशननंतर शाहरुखच्या नाकावर पट्टी बांधेलली दिसत आहे. शाहरुख आता भारतात परतला असून तो या दुखापतीतून सावरत आहे.

ही बातमी अपडेट हाेत आहे. (bollywood actor shah rukh khan reportedly gone through a surgery in us after meting with an accident in los angeles )

अधिक वाचा-
काजाेलची लेक न्यासा पॅपराझींना हाताळते ‘अशा’ प्रकारे; अभिनेत्री म्हणाली, ‘तिच्या जागी मी असते, तर…’
किशाेरवयात तेजस्वीचा झाला हाेता विनयभंग; खुलासा करत म्हणाली,’मी रस्त्यावर एकटी हाेती अन् दोन मुलं…’

हे देखील वाचा