बॉलिवूड स्टार्सच्या ट्विटर अकाऊंटवरून ब्लू टिक गायब होताच सोशल मीडियावर मीम्सचा वर्षाव हाेत आहे. नेटिझन्सनी ट्विटरचे सीईओ इलॉन मस्क यांना वेगवेगळ्या प्रकारे ट्रोल करण्यास सुरुवात केलीय. बॉलीवूड स्टार्सना त्यांच्या अतरंगी स्टाइलमुळे सोशल मीडियावर ट्रोल केले जात असले, तरी ते ट्रोल करण्याच्या बाबतीत कुणापेक्षा कमी नाहीत, याचे ताजे उदाहरण म्हणजे अभिनेता शाहिद कपूर.
ब्लू टिक काढून टाकण्याचा एक मेम शेअर करत अभिनेत्याने मस्करीत ट्विटरच्या सीईओला धमकी दिली आहे. खरं तर, एका युजरने शाहिदच्या ‘कबीर सिंग’ चित्रपटाची मीम शेअर केला आणि लिहिले, “शाहिद कपूर ब्लू टिकसाठी एलोन मस्कला मारहाण करणार आहे.” यानंतर, अभिनेत्याने हे ट्विट मजेदार पद्धतीने रिट्विट केले आणि लिहिले, “माझ्या ब्लू टिकाला काेणी टच केले? अॅलन, तिथेच थांब, मी येतोय.”
Mere blue tick ko kisne touch kiya… Elon, tu wahi ruk main aaraha hu.
Haha ???? https://t.co/fuzsEUds9o
— Shahid Kapoor (@shahidkapoor) April 21, 2023
फक्त शाहिदच नाही, तर अमिताभ बच्चन, शाहरुख खान, सलमान खान, प्रियांका चोप्रा जोनास, रणवीर सिंग, अजय देवगण, अक्षय कुमार, आलिया भट्ट आणि अनुष्का यांच्यासह इतर बॉलिवूड स्टार्सच्या ब्लू टिक्स काढल्या गेल्या आहेत.
खरं तर, ट्विटरच्या घोषणेनुसार, व्हेरिफाईड अकाउंट्समधून फ्री ब्लू टिक्स काढून टाकण्यात आल्या आहेत. आता युजर्सला ब्लू टिकसाठी पैसे द्यावे लागतील. म्हणजेच ज्यांनी ट्विटरला ब्लू प्लॅनसाठी पैसे दिले नाहीत, त्यांच्या खात्यातून ब्लू टिक्स काढून टाकण्यात आल्या आहेत. एकदा फी भरल्यानंतर, निळ्या रंगाचे टिक चिन्ह पुनर्संचयित केले जाईल.(bollywood actor shahid kapoor reacted on loosing blue tick on twitter actor shared kabir singh memes goes viral on internet)
दैनिक बोंबाबोंबचा व्हॉट्सऍप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बोंबाबोंबचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
‘माझ्यापासून लांब राहायचे’ म्हणत जया बच्चन यांचा पुन्हा चढला पारा, रागात पापाराझींना दिली धमकी
क्रिती सेननने इकॉनॉमी क्लासच्या फ्लाइटमध्ये केला प्रवास; युजर्स अभिनेत्रीच्या सादगीचे काैतुक करत म्हणाले…