Monday, April 15, 2024

क्रिती सेननने इकॉनॉमी क्लासच्या फ्लाइटमध्ये केला प्रवास; युजर्स अभिनेत्रीच्या सादगीचे काैतुक करत म्हणाले…

सेलेब्सने लाखो प्रयत्न केले तरी ते कॅमेरा किंवा चाहत्यांच्या नजरेतून कधीच सुटू शकत नाहीत. अशातच क्रिती सेनन अलीकडेच विमानाच्या इकॉनॉमी क्लासमध्ये प्रवास करताना दिसले. काळ्या फेस मास्कसह उन्हाळी पांढरा पोशाख घालून तिने लो प्रोफाइल ठेवण्याचा प्रयत्न केला. मात्र, तरीदेखील एका प्रवाशाने तिला ओळखले आणि तिचा कॅमेरात व्हिडिओ शूट केला.

व्हायरल झालेल्या एका व्हिडिओमध्ये क्रिती सेनन (kriti sanon) फ्लाइटमधून उतरताना दिसत आहे, तर आणखी एका व्हिडिओमध्ये क्रिती समोरच्या सीटवर बसलेल्या बाळाशी बोलताना दिसत आहे. त्यांनतर दाेघेही एकमेकात रमले असून खेळताना देखील दिसत आहे.

पॅपराझींने हा व्हिडिओ शेअर करताच नेटकऱ्यांनी त्यावर संमिश्र प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका युजरने कमेंट करत लिहिले की, “ती ज्या फ्लाइटमध्ये बसली त्यात फर्स्ट क्लास किंवा बिझनेस क्लास नाही.” तर, एका युजरने विचारले की, “मग काय मोठी गोष्ट आहे?” अशात एका युजरने लिहिले की, “कारण, इंडिगोमध्ये कोणताही बिझनेस क्लास नाही.”

 

View this post on Instagram

 

A post shared by Viral Bhayani (@viralbhayani)

काही सोशल मीडिया युजर्सने क्रिती सेननच्या साधेपणाचेही काैतुक केले आहे. एका युजर्स लिहिले,”एक लहान मूल दुसऱ्या मुलासोबत खेळत आहे.”, तर दुसऱ्या युजरने लिहिले की, “ती आतापर्यंतची सर्वात गोड व्यक्ती आहे.”

 

View this post on Instagram

 

A post shared by Viral Bhayani (@viralbhayani)

क्रिती सेननच्या वर्कफ्रंटबद्दल बाेलायचे झाले, तर क्रिती अखेरची कार्तिक आर्यनसाेबत ‘शेहजादा’ चित्रपटामध्ये दिसली होती. मात्र, रोहित धवन दिग्दर्शित हा कॉमेडी चित्रपट बॉक्स ऑफिसवर फ्लॉप झाला. अशात आता क्रिती आणि प्रभासचा ‘आदिपुरुष’ हा सिनेमा 16 जूनला थिएटरमध्ये प्रदर्शित हाेत आहे. या चित्रपटात अभिनेत्री सीतेची भूमिका साकारत आहे.(bollywood actress kriti sanon traveled in the economy class of the flight fans became fond of simplicity watch video )

दैनिक बोंबाबोंबचा व्हॉट्सऍप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बोंबाबोंबचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
…म्हणून शूटींगच्या सेटवर फराह खानने लगावली होती जुही चावलाच्या कानशिलात; अभिनेत्रीने स्वत: केला खुलासा

‘हे’ सुपरस्टार आजही करतात शेती, कलाकार म्हणतो की, ‘शेण उचलल्याशिवाय दिवस सुरू होत नाही….,’

हे देखील वाचा