अलीकडेच ‘फर्जी‘ या वेब सीरिजमधून डिजिटल पदार्पण करणारा शाहिद कपूर कोणत्या ना कोणत्या कारणाने चर्चेचा भाग बनतो. अशातच अभिनेता त्याच्या लेटेस्ट आउटिंगसाठी प्रसिद्धीच्या झोतात आला आहे. शाहिद कपूरचा नुकताच स्पॉट झालेला व्हिडिओ त्याच्या लूकपेक्षा चाहत्याच्या अॅक्शनकडे लक्ष वेधून घेत आहे. त्याचवेळी चाहत्यांच्या या वृत्तीवर लोकांनी खुद्द शाहिदलाच खडसावायला सुरुवात केली आहे. काय आहे नेमके प्रकरण? चला जाणून घेऊया…
शाहिद कपूर (shahid kapoor) याचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर माेठ्या प्रमाणात व्हायरल हाेत आहे. या क्लिपमध्ये अभिनेत्याची एक फिमेल फॅन त्याला भेटण्यासाठी खूप उत्सुक दिसत आहे. प्रथम फिमेल फॅनने अभिनेत्यासोबत सेल्फी काढला आणि त्यानंतर तिने जे केले ते पाहून सर्वजण थक्क झाले.
व्हायरल व्हिडिओमध्ये शाहिद कपूर पांढर्या ओव्हर साइज टी-शर्ट आणि काळ्या शॉर्ट्समध्ये दिसत आहे. त्याचबरोबर त्याने मॅचिंग शूज घातले आहेत, ज्यात अभिनेता प्रचंड देखणा दिसत आहे. दुसरीकडे, शाहिद कपूरसोबत सेल्फी घेतल्यानंतर, फिमेल फॅन अभिनेत्याच्या पायांना स्पर्श करताना दिसली, जे पाहून नेटकऱ्यांच्या भुवया उंचावल्या आहेत.
View this post on Instagram
शाहिद कपूरच्या या व्हिडिओ कमेंट करताना एका युजरने लिहिले आहे की, ‘पाय स्पर्श करण्याची काय गरज आहे… आवडता अभिनेता देव नाही. प्रेम आणि आदर दाखवण्याचे इतर मार्ग आहेत..!!’, तर दुसर्याने लिहिले आहे की, ‘ती शाहिद कपूरला देव असल्याप्रमाणे वागत आहे.’
View this post on Instagram
शाहिद कपूरच्या वर्क फ्रंटबद्दल बाेलायचे झाले, तर शाहिद अली अब्बास जफरच्या आगामी ‘ब्लडी डॅडी’ या चित्रपटात अॅक्शन अवतारात दिसणार आहे. हा चित्रपट 2011च्या फ्रेंच चित्रपट न्युट ब्लँचेचा अधिकृत हिंदी रिमेक आहे.(bollywood actor shahid kapoor trolled as a fan touches his feet video viral )
दैनिक बोंबाबोंबचा व्हॉट्सऍप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बोंबाबोंबचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
शीझान खानने तुनिषा शर्माला म्हटले ‘चांद’! अभिनेत्रीसाेबतचा ‘ताे’ फाेटाे केला शेअर
ईदची पार्टी न दिल्याने जावेद अख्तर अन् शबाना आझमी दु:खी, व्हिडिओ शेअर करून सांगित ‘हे’ कारण