Monday, December 23, 2024
[aioseo_breadcrumbs]

प्रीतीच्या लग्नासाठी कबीर सिंगची जैसलमेरला धाव, पाहाच व्हायरल व्हिडिओ

आजपासून बॉलिवूडमधील बिग फॅट वेडींगला सुरुवात होत आहे. मागील अनेक दिवसांपासून या लग्नाची तुफान चर्चा चालू होती. अथिया शेट्टी आणि केएल राहुल नंतर बॉलिवूडमध्ये सिद्धार्थ मल्होत्रा आणि कियारा अडवाणी यांच्या लग्नामुळे चांगलाच बज निर्माण झाला आहे. अनेक वर्षांपासून कियारा आणि सिद्धार्थ एकमेकांना डेट करत होते. शिवाय मधल्या काही दिवसांपासून त्यांच्या लग्नाच्या तुफान चर्चा मीडियामध्ये चालू होत्या. अखेर आता लवकरच ते लग्न बंधनात अडकणार आहे. दोघांच्याही लग्नाची जोरदार तयारी चालू असून, ते जैसलमेर येथे लग्न करणार आहेत. त्याशिवाय सिद्धार्थ आणि कियारा तिथे लग्नाच्या ठिकाणी पोहोचल्या आहेत. अशातच कबीर सिंग म्हणजेच अभनेता शाहिद कपूर आणि मिरा राजपूतही जैसलमेरला निघाले आहेत. त्याशिवाय त्यांचा व्हिडिओ देखिल तुफान व्हायरल होत आहे.

शेरशाह (Shershaah) कपल म्हणजेच सिद्धार्थ मल्होत्रा ( Sidharth Mlahotra) आणि कियारा अडवानी (Kiara Advani) यांचा ग्रॅंड विवाहसोहळा जैसलमेरमधील सूर्यगढ पॅलेसवर पार पडणार आहे. त्यामुळे त्यांच्या लग्नाची जोरदार तयारी सुरु आहे. आजपासूनच लग्नापूर्वीच्या कार्यक्रमांना सुरुवात होणार आहे. त्यामुळे अनेक बॉलिवूड मंडळी जैसरमेलला रवाना झाली आहे. अशातच आता अभिनेता शाहिद कपूर (Shahid Kapoor) आणि त्याची पत्नी मीरा राजपूत (Meera Rajput), करण जोहर (Karan Johar) नुकतेच मुंबई विमानतळावरुन जातान दिसले.

या विवाह सोहळ्यामध्ये त्यांच्या कुटुंबियांना आणि जवळच्या मित्रपरिवारासोबतच बॉलिवूडमधील दिग्गज स्टार्सलाही आमंत्रित केलं असल्याचं चार्चा आहेत. मीडिया रीपोर्टनुसार या सोहळ्यात या दोघांनी मोजक्याच लोकांना निमंत्रण दिलेलं आहे. दाक्षिणात्य अभिनेता राम चरण, कॅटरिना कैफ, रकुल प्रीत सिंग, जॅकी भग्नानी हे कलाकार या शाही विवाह सोहळ्यात हजेर लावतील अशी शक्यता वर्तवली जात आहे.

 

View this post on Instagram

 

सिद्दार्थच्या वर्कफ्रंटबद्दल सांगायचे झाले तर त्याने नुकतंच योद्धा चित्रपटाचं शुटींग पूर्ण केली आहे. तर कियारा सध्या ‘सत्यप्रेम की कथा‘ आणि राम चरणसोबत ‘आरसी 15‘ या चित्रपटांवर काम करत आहेत. (दि, 6 फेब्रुवरी) रोजी सिद्धार्थ आणि कियाराचा रॉयल लग्नसोहळा थटामाटात पार पडणार आहे. त्याशिवाय दिल्लीमध्ये रिसेप्शन होणार अल्यच्याही चर्चा आहेत.

दैनिक बाेंबाबाेंबचा व्हाॅटसऍप ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
सिनेजगतातील दिग्गज पत्रकाराचे निधन, दीर्घकाळापासून आजाराने हाेते त्रस्त

रवी किशनच्या कुटुंबावर कोसळला दु:खाचा डोंगर, अभिनेत्याच्या जवळच्या व्यक्तिने गमावले प्राण

हे देखील वाचा