Friday, September 20, 2024
Home कॅलेंडर काय सांगता! शाहिद कपूरला एक-दोन नव्हे तर आहेत तीन-तीन आई वडील, विश्वास बसत नाही? वाचा संपुर्ण स्टोरी

काय सांगता! शाहिद कपूरला एक-दोन नव्हे तर आहेत तीन-तीन आई वडील, विश्वास बसत नाही? वाचा संपुर्ण स्टोरी

बॉलिवूड अभिनेता शाहिद कपूर याचा आज त्याचा वाढदिवस आहे. 25 फेब्रुवारी 1981 रोजी त्याचा जन्म झाला. त्याने त्याच्या कष्टाने या इंडस्ट्रीमध्ये त्याचे नाव कमावले आहे. त्याला रोमँटिक अंदाजात पाहायला सगळ्यांना खूप आवडले होते. परंतु ऍक्शन थ्रिलर चित्रपटात देखील त्याला चांगलाच परिचय मिळाला. त्याला त्याच्या या भूमिकेसाठी अनेक अवॉर्ड देखील मिळाले आहेत. शाहिद त्याच्या व्यावसायिक आयुष्यामुळे जेवढा चर्चेत असतो. तेवढाच तो त्याच्या वैयक्तिक आयुष्यामुळे देखील चर्चेत असतो. बॉलिवूडचा चॉकलेट बॉय म्हणून ओळखला जाबॉलिवूड अभिनेता शाहिद कपूरने त्याच्या कष्टाने या इंडस्ट्रीमध्ये त्याचे नाव कमावले आहे. त्याला रोमँटिक अंदाजात पाहायला सगळ्यांना खूप आवडले होते. परंतु ऍक्शन थ्रिलर चित्रपटात देखील त्याला चांगलाच परिचय मिळाला. त्याला त्याच्या या भूमिकेसाठी अनेक अवॉर्ड देखील मिळाले आहेत. शाहिद त्याच्या व्यावसायिक आयुष्यामुळे जेवढा चर्चेत असतो. तेवढाच तो त्याच्या वैयक्तिक आयुष्यामुळे देखील चर्चेत असतो. 25 फेब्रुवारी 1981 ला शाहिदचा मुंबईत जन्म झाला. बॅकग्राउंड डान्सर, सहायक भूमिकांपासून सुरु झालेला त्याचा प्रवास आज सुपरस्टारपर्यंत येऊन पोहचला आहे. अभिनयासोबतच उत्कृष्ट डान्सर असलेल्या शाहिदने अनेक सिनेमांमध्ये बॅकग्राउंड डान्सर म्हणून डान्स केला.

पंकज कपूर आणि नीलिमा अजीम हे शाहिदचे आई, वडील. बालपणापासूनच शाहिद रोल, कॅमेरा, ऍक्शन या वातावरणात मोठा झाला. साहजिकच त्याचा ओढा या क्षेत्राकडे जास्त झाला. तसे पाहिले तर शाहिदचे बालपण अतिशय चढ उतारांनी भरलेले होते. शाहिद तीन वर्षाचा झाला आणि त्याच्या आई, वडिलांचा घटस्फोट झाला. त्यानंतर त्याच्या आई, वडिलांनी पुन्हा संसार थाटला. आज 40 व्या वर्षी शाहिदला तीन आई आणि तीन वडील आहेत. आता तुम्ही म्हणाल कसे काय? या लेखातून आपण जाणून घेणार आहोत शाहिदच्या तीन आई आणि तीन वडिलांबद्दल.

पंकज कपूर आणि नीलिमा अजीम यांचे लग्न 1975 साली झाले. त्यानंतर 25 फेब्रुवारी 1981 साली शाहिदचा जन्म झाला. पाहिले तर पंकज कपूर आणि नीलिमा अजीम हे शाहिदचे बायोलॉजिकल (जन्मदाते) आई वडील आहे. मात्र 1984 साली पंकज आणि नीलिमा यांनी घटस्फोट घेतला आणि ते वेगळे झाले. शाहिद हा त्याच्या आईसोबतच होता. पुढे पंकज यांनी सुप्रिया पाठक यांच्यासोबत लग्न केले. पंकज कपूर व सुप्रिया पाठक यांना सना कपूर ही मुलगी आणि रुहन कपूर हा मुलगा आहे. सुप्रिया पाठक ह्या शाहिदच्या दुसऱ्या आई आहेत.

दुसरीकडे नीलिमा यांनी राजेश खट्टर यांच्याशी लग्न केले. राजेश खट्टर हे शाहिदचे दुसरे वडील झाले. राजेश आणि नीलिमा यांना 1995 साली ईशान नावाचा मुलगा झाला. मात्र 2001 मध्ये दुर्दैवाने नीलिमा आणि राजेश यांचे लग्न तुटले, आणि त्यांचा घटस्फोट झाला. ईशानने देखील बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. ईशानने माजिद मजीदी यांच्या ‘बियॉन्ड द क्लाउड्स’ सिनेमातून अभिनयाला सुरुवात केली आहे. तो सैराटच्या हिंदी रिमेक असलेल्या ‘धडक’मध्ये देखील झळकला.

नीलिमाने राजेश खट्टर यांच्याशी घटस्फोटानंतर उस्ताद रजा अली खान यांच्यासोबत तिसरे लग्न केले.या लग्नामुळे उस्ताद रजा अली खान हे शाहिदचे तिसरे वडील झाले. इथेही नीलिमा यांना दुःखच मिळाले कारण हे लग्न देखील जास्त काळ चालले नाही. नीलिमा आणि उस्ताद रजा यांचा पुढे घटस्फोट झाला.

काही दिवसांनी राजेश खट्टर यांनी अभिनेत्री वंदना सजनानी यांच्यासोबत लग्न केले. या नात्याने वंदना शाहिदच्या तिसऱ्या आई झाल्या. शाहिदचे त्याच्या सर्व भाऊ, बहिणींसोबत आणि आई, वडिलांसोबत जिव्हाळ्याचे संबंध आहे. अनेकदा शाहिद त्याच्या परिवारासोबत कार्यक्रमांमध्ये एकत्र दिसतो.(meet shahid kapoors 3 father sand 3 mothers 2)

दैनिक बाेंबाबाेंबचा व्हाॅटसऍप ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
साजिद खानसोबतच्या अफेयरच्या चर्चांवर बोलताना सौंदर्या म्हणाली, “ते नेहमीच माझ्यासाठी…’
‘तारक मेहता…’च्या दयाबेन यांचा नवीन व्हिडिओ व्हायरल, कुटुंबासोबत दिसल्या अभिनेत्री दिशा वाकाणी

author avatar
Tejswini Patil

हे देखील वाचा