Saturday, June 29, 2024

काय सांगता! कॅटरिनाने शाहरुखला किस करण्यासाठी केली हाेती बळजबरी? अभिनेत्यानं स्वत:च केला खुलासा

बाॅलिवूड अभिनेता शाहरुख खानची फॅन फॉलोइंग खूप मोठी आहे. देशातच नाही, तर परदेशातही अभिनेत्याचे चाहते आहेत. मात्र, अभिनेत्याचा किंग खान बनण्यापर्यंतचा प्रवास इतका सोपा नव्हता. इथपर्यंत पोहोचण्याची त्यांची धडपड अनेकांना प्रेरणा देते. त्याच्यासोबत काम करण्यांची अनेक अभिनेत्रींची इच्छा असते. अशात नुकताच शाहरुख खानने एक धक्कादायक खुलासा केला आहे. खरे तर, किंग खान त्याच्या चित्रपटांसाठी नो किसिंग पॉलिसी अवलंबत असे. मात्र, अभिनेत्याने वयाच्या 40व्या वर्षी कॅटरिना कैफसाठी हा नियम मोडला. अशात आता शाहरुखने यामागचे रहस्य उघड केले आहे. काय म्हणाला अभिनेता? चला, जाणून घेऊया…

अभिनेता शाहरुख खान (shahrukh khan) नेहमीच कॅमेऱ्या समाेर किस करणे विचित्र समजत होता. मात्र, वयाच्या 40व्या वर्षी त्यांनी यश चोप्राच्या ‘जब तक है जान’ या चित्रपटासाठी हा नियम मोडला. 2012मध्ये एका कार्यक्रमादरम्यान शाहरुख खानने खुलासा केला होता की, हे त्यांच्या अटीत बसत नसतानाही ताे ऑनस्क्रीन किस करण्यास का तयार झाला. सुपरस्टार किंग खानने खुलासा करत सांगितले की, ‘हे खूप विचित्र आहे, पण नंतर त्याने माझ्यावर जबरदस्ती केली आणि मला अतिरिक्त पैसेही दिले.’

माध्यमातील वृत्तांनुसार, शाहरुख एका कार्यक्रमात किसिंग सीनबद्दल म्हणाला होता की, “मी खूप प्रामाणिकपणे सांगेन. मी हे, यश जी आणि कॅटरिना यांना नम्रतेने सांगेन की, त्यांना माहित होते की, मी विचित्र आहे. माझ्यासोबत काम करणं फार सोपं नव्हतं. ते माझ्या कुटुंबासारखे आहेत, पण नंतर त्यांनी सर्वांनी एकत्र येऊन मला किसिंग सीन करायला लावले आणि त्यांनी मला जबरदस्ती केली. मला किसिंग सीन करण्यासाठी फीही दिली गेली. म्हणून मी नकार देऊ शकलाे नाही.” असे शाहरुख खानने माध्यमाना दिलेल्या मुलाखतीत सांगितले.( bollywood actor shahrukh khan talked about his on screen kissing scene with katrina kaif in yash chopra and aditya chopra film jab tak hai jaan )

अधिक वाचा- 
‘नमक हलाल’, ‘गाेल माल’ यासारख्या दमदार चित्रपटांमध्ये काम करणाऱ्या अभिनेत्याचा मृत्यू, सिनेसृष्टीत पसरली शाेककळा
‘बिग बॉस 16’ मधील स्पर्धक श्रीजिता डे अडकली लग्न बंधनात, प्रियकरासाेबत दिल्या रोमँटिक पाेज

हे देखील वाचा