Saturday, June 29, 2024

अवॉर्ड फंक्शनमध्ये पाहायला मिळाली सिड – कियाराची जबरदस्त केमिस्ट्री, दाेघांनी हातात हात घेतला अन्…

बॉलिवूडचे प्रसिद्ध जोडपे सिद्धार्थ मल्होत्रा ​​आणि कियारा अडवाणी यांनी बरीच वर्ष एकमेकांना डेट केल्यानंतर 7 फेब्रुवारी 2023 रोजी जैसलमेर येथील सूर्यगढ पॅलेसमध्ये मोठ्या गाजवाज्यात लग्न केले. अशात लग्नानंतरच्या पहिल्या पुरस्कार साेहळ्यात हे जाेडपे एकत्र दिसले. यादरम्यान, ते दोघेही मिडियापासून थाेडे दूर-दूर राहिले. पुरस्काराच्या या कार्यक्रमात सुरुवातीला कियाराने प्रवेश केला, तर नंतर थाेड्या वेळानी सिद्धार्थ पाेहचला.

कियारा (kiara advani) आणि सिद्धार्थ (sidharth malhotra) पुरस्काराच्या कार्यक्रमात वेगवेगळे पाेहचले असले तरी, दाेन्ही कलाकार स्टेजवर एकत्र दिसले. यावेळी दोघांची केमिस्ट्री चांगलीच रंगली. कियाराने या पुरस्कार शोसाठी पिवळ्या रंगाची साडी परिधान केली हाेती, तर सिद्धार्थ काळ्या शर्ट पँट आणि राखाडी रंगाच्या ब्लेझरमध्ये प्रचंड देखना दिसत हाेता.

या व्हिडिओमध्ये कियारा पुरस्कार देताना दिसत आहे, तर सिद्धार्थ स्टेजवर पोहोचताच कियाराला मिठी मारताना दिसला. यानंतर, हा पुरस्कार अभिनेत्याच्या हाताला देण्यात आला. हे जोडपे एकत्र खूप आनंदी दिसत होते.

मंडळी, या दोघांची प्रेमकथा परी कथेपेक्षा कमी नाही. या जाेडप्यांची कॅप्टन बत्राच्या जीवनावर बनलेल्या ‘शेरशाह’ चित्रपटाच्या सेटवर मैत्री झाली होती. यानंतर दोघे रिलेशनशिपमध्ये आले. दोघेही बऱ्याच दिवसांपासून एकमेकाना डेट करत हाेते. त्यांच्या नात्याची चर्चाही साेशल मीडियावर रोज रंगत असे. अशात या जोडप्याने 7 फेब्रुवारीला राजस्थानमध्ये कुटुंब आणि काही खास मित्र यांच्या उपस्थित लग्न केले, त्यानंतर या दोघांचे फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल झाले.(bollywood actor sidharth malhotra and actress kiara advani attend award function bollywood couple looking great together)

दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
दिग्दर्शक राजकुमार हिरानींनी मागितली शाहरूखची माफी, नेमके काय प्रकरण आहे?

‘मन की बात’मध्ये मोदींनी काढली लता मंगेशकर यांची आठवण, जाणून घ्या काय बाेलले स्वर कोकिळाबद्दल

हे देखील वाचा