Sunday, June 23, 2024

दिग्दर्शक राजकुमार हिरानींनी मागितली शाहरूखची माफी, नेमके काय प्रकरण आहे?

शाहरुख खान सध्या पठाण चित्रपटामुळे खुप चर्चेत आहे नुकतेच त्याच्या चित्रपटाने 1000 कोटींचा टप्पा पार केला आहे. पहिल्यांदाच असे काही घडले की 40 दिवसांनतर एखादा चित्रपट चित्रपटगृहात टिकून आहे. आणि ते पठाण आणि वेड या चित्रपटांच्या बाबतीत घडल. शाहरुख आता डंकी हा चित्रपट येणार आहे. त्यामुळे पुन्हा एकदा शाहरुख चर्चेत आला आहे. पण विशेष म्हणजे डंकी चित्रपटाचे दिग्दर्शक राजकुमार हिरानी यांनी शाहरुखची माफी मागितली. नेमके असे काय घडले की, दिग्दर्शकाला शाहरूखची माफी मागावी लागली. 

बॉलीवूडचा (bollywood) सुपरस्टार शाहरुख खान सध्या त्याच्या ‘पठाण’ (pathaan) चित्रपटामुळे खूप चर्चेत आहे. शाहरुख खानचा (shahrukh khan) ‘पठाण’ चित्रपट पहिल्या दिवसापासून बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालत आहे. शाहरुख खानच्या चित्रपटाने भारतीय बॉक्स ऑफिसवर 1000 कोटींहून अधिक कमाई केली आहे. शाहरुख खानच्या ‘पठाण’ व्यतिरिक्त, त्याच्या जवान आणि डंकी या चित्रपटांसाठी देखील प्रसिद्ध आहे. दरम्यान, शाहरुख खानच्या डंकी या चित्रपटाशी संबंधित एक नवीन बातमी समोर आली आहे. डंकी या चित्रपटाचे दिग्दर्शक राजकुमार हिरानी यांनी शाहरुख खानबद्दल असे काही बोलले आहे, ज्यामुळे शाहरुख खान पुन्हा एकदा बॉलीवूडमध्ये चर्चेचा विषय बनला आहे.

शाहरुख खानचा डंकी हा चित्रपट 2023 मध्ये प्रदर्शित होणार आहे. राजकुमार हिरानी या चित्रपटाचे दिग्दर्शन करत आहेत. शाहरुख खान आणि राजकुमार यांचा हा पहिलाच चित्रपट आहे, ज्यात दोघे एकत्र दिसत आहेत. दिग्दर्शक राजकुमार हिरानी यांनी शाहरुख खानसोबत काम करण्याचा अनुभव शेअर केला.

मीडियाशी बोलताना राजकुमार हिरानी यांनी शाहरुख खानचे खूप कौतुक केले. ते म्हणाले की, ‘शाहरुख खान लोकांना सेटवर खुश ठेवतो. तो खूप मेहनती अभिनेता आहे. त्याने दोन दिवसांचे शूट दोन तासांत पूर्ण केल्यावर मला आश्चर्य वाटले.’

याआधी शाहरुख खानसोबत काम न केल्याबद्दल दिग्दर्शक राजकुमार हिरानी यांना खंत वाटत आहे. मीडियाशी संवाद साधताना ते म्हणाले की, शाहरुख खानसोबत काम केल्यानंतर मला असे वाटले की, मी यापूर्वी त्याच्यासोबत काम कार्याला हव होत. शाहरुख खानचा डंकी हा चित्रपट या वर्षी डिसेंबर महिन्यामध्ये प्रदर्शित होणार आहे. (rajkumar-hirani-became-fan-of-actor-shahrukh-khan-after-pathaan-rajkumar-hirani)

दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
नागराज मंजुळेंच्या नविन गाण्याने घातला धुमाकुळ…एकदा पाहाच
‘तारक मेहता का उल्टा चश्मा’ फेम शैलेश लोढांनी सांगितलं सीरियल सोडण्यामागील खरं कारण, म्हणाले…

हे देखील वाचा