बॉलीवूडमधील सर्वात लोकप्रिय जोडपे सिद्धार्थ मल्होत्रा आणि कियारा अडवाणी त्यांचे लग्न झाल्यापासून सतत चर्चेत आहेच. या जोडप्याच्या लग्नापासून ते रिसेप्शनपर्यंतचे फोटो सोशल मीडियावर सातत्याने व्हायरल होत आहेत. सिड आणि कियाराला एकत्र पाहण्यासाठी चाहते खूप उत्सुक आहेत. अशात आता होळीच्या सणानिमित्त सिद्धार्थने त्याच्या सोशल मीडिया हँडलवर स्वतःचा आणि कियाराचा एक खास फोटो शेअर केला आहे.
सिद्धार्थ मल्हाेत्रा (sidharth malhotra) आणि कियारा आडवाणी (kiara advani) यांनी लग्नानंतरची पहिली हाेळी एकत्र साजरी केली. अशात सिद्धार्थने त्याच्या अधिकृत इन्स्टाग्राम हँडलवर होळीचा एक फोटो चाहत्यांसोबत शेअर केला आहे. या फोटोमध्ये कियारा आणि सिद्धार्थ हाेळीच्या रंगात रंगलेले दिसत आहेत.
View this post on Instagram
हा फोटो पोस्ट करत सिद्धार्थने कॅप्शनमध्ये लिहिले की, ‘मिसेससोबत पहिली होळी’ सिद्धार्थच्या या फोटोंवर चाहते भरभरुन प्रेमाचा वर्षाव करत आहे. यावर कमेंट करत एका युजरने लिहिले की, ‘किती सुंदर जाेडी दिसत आहे. देव कोणाच्याही नजर लागू देवू नकाे.’, तर दुसर्या युजरने कमेंट करत लिहिले की, ‘सिड आणि कियारा यांची जोडी खूप छान दिसते.’ अशात एका युजरने कमेंट केली की, ‘त्यांची होळी किती स्वच्छ असते.’अशाप्रकारे या जोडप्याच्या चाहत्यांनी भिन्नभिन्न कमेंट करून होळीच्या शुभेच्छा दिल्या आहेत.
7 फेब्रुवारीला राजस्थानमधील सूर्यगढ पॅलेसमध्ये कियारा आणि सिद्धार्थ विवाहबंधनात अडकले होते, ज्यानंतर या जोडप्याने आधी दिल्ली आणि नंतर मुंबईत ग्रँड रिसेप्शनही दिले. सिड-कियाराच्या मुंबई रिसेप्शनला करीना कपूर, नीतू कपूर, आलिया भट्ट, काजोल, अजय देवगण, रणवीर सिंग, विकी कौशल, वरुण धवन आणि नताशा दलाल यांच्यासह सर्व बॉलिवूड स्टार्सनी हजेरी लावली होती. (bollywood actor sidharth malhotra celebrate their first holi with actress kiara advani)
दैनिक बाेंबाबाेंबचा व्हाॅटसऍप ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
गोपी बहूने साजरी केली लग्नानंतरची पहिली होळी, एकदा व्हिडिओ पाहाच
शिल्पा शेट्टीने कुटुंबासाेबत साजरा केला हाेळीचा सण, पाेस्ट शेअर करत फॅन्सला दिला खास संदेश