Tuesday, April 8, 2025
Home बॉलीवूड सिद्धार्थने पत्नी कियाराला समर्पित केला बेस्ट स्टाइलचा पुरस्कार, अभिनेत्रीने ‘अशी’ दिली प्रतिक्रिया

सिद्धार्थने पत्नी कियाराला समर्पित केला बेस्ट स्टाइलचा पुरस्कार, अभिनेत्रीने ‘अशी’ दिली प्रतिक्रिया

बॉलिवूड अभिनेता सिद्धार्थ मल्होत्रा ​​आणि अभिनेत्री कियारा अडवाणी यांचे लग्न गेल्या महिन्यात झाले. लग्नानंतरही हे दोन्ही कलाकार माेठ्या प्रमाणात चर्चेत हाेते. यासाेबतच दोघांच्या लग्नाची आणि त्यांच्या आउटफिटची सगळीकडे बरीच चर्चा झाली होती. अशात काल रात्री म्हणजेच (दि. 24 मार्च)ला एका पुरस्कार सोहळ्यादरम्यान सिद्धार्थ मल्होत्राला बेस्ट स्टाइलचा पुरस्कार प्रदान करण्यात आला. अभिनेत्याने हा पुरस्कार पत्नी कियारा अडवाणीला समर्पित केला आहे, ज्यानंतर अभिनेत्रीने यावर प्रतिक्रिया दिली. काय म्हणाली अभिनेत्री? चला जाणून घेऊया…

खरं तर, शुक्रवारी (दि. 24 मार्च)ला बॉलिवूड हंगामा स्टाईल आयकॉन अवॉर्ड सोहळा पार पडला. या सोहळ्यात अनेक कलाकार सहभागी झाले होते. या सोहळ्यात अभिनेता सिद्धार्थ मल्होत्रा ​​याला सर्वोत्कृष्ट स्टाइलचा पुरस्कार मिळाला. हा पुरस्कार स्वीकारताना सिद्धार्थ म्हणाला की, “लग्नानंतरचा हा माझा दुसरा पुरस्कार आहे, त्यापैकी पहिला मला सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा, तर दुसरा मला सर्वोत्कृष्ट स्टाइलचा पुरस्कार मिळाला आहे. त्यामुळे मला वाटते की, माझी पत्नी कियारा खूप आनंदी असेल. कारण, ती स्वतः खूप चांगली अभिनेत्री आहे आणि खूप स्टायलिश आहे. त्यामुळे मी त्या डिझायनरकडे कूल दिसण्यासाठी कायम जातो.” अभिनेत्याच्या या भाषणाचा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.

 

हा व्हिडिओ अभिनेत्री कियाराने तिच्या इंस्टाग्राम स्टोरीवर शेअर केला आहे. व्हिडीओ शेअर करत अभिनेत्रीने लिहिले, “या माणसाकडे माझे संपूर्ण हृदय आहे.” अभिनेत्रीने अशाप्रकारे व्हिडिओ शेअर करत आनंद व्यक्त केला आहे.

sidharth malhotra
Photo Courtesy Instagramkiaraaliaadvani

मंडळी आम्ही तुम्हाला सांगतो की, या जोडप्याने 7 फेब्रुवारीला जैसलमेरमध्ये लग्न केले होते, ज्यानंतर दोघांनी आधी दिल्लीत आणि नंतर मुंबईत राॅयल रिसेप्शन पार्टी दिली हाेती.(bollywood actor sidharth malhotra dedicated his best style award to wife kiara advani actress said this man has my whole heart )

दैनिक बाेंबाबाेंबचा व्हाॅटसऍप ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
‘मी त्याला बजावले होते स्वतःला…’ स्मृती इराणी यांनी दिला सुशांत सिंगच्या आठवणींना उजाळा

‘ही तर उर्फीची आई निघाली’ म्हणत नेटकऱ्यांनी केले मलायकाला ‘त्या’ ड्रेसवरून ट्रोल

हे देखील वाचा