Tuesday, March 5, 2024

‘मी त्याला बजावले होते स्वतःला…’ स्मृती इराणी यांनी दिला सुशांत सिंगच्या आठवणींना उजाळा

टेलिव्हिजन इंडस्ट्रीमधील तुलसी अर्थात अभिनेत्री स्मृती इराणी सध्या मनोरंजनविश्वपासून लांब त्यांच्या राजकीय क्षेत्रात कार्यरत आहे. त्यांनी त्यांच्या अभिनयाने अनेक मालिका आणि टेलिव्हिजनविश्व गाजवले. आज त्यांना ओळखत नाही अशी व्यक्ती शोधूनही सापडणार नाही. नुकतेच स्मृती इराणी यांनी सुशांत सिंग राजपूतच्या निधनाच्या दिवसाबद्दल एका मुलाखतीमध्ये भाष्य केले आहे.

एका मुलाखतीमध्ये त्यांना सुशांतवर प्रश्न विचारला गेल्यानंतर त्यांनी बोलतांना सांगितले, “ज्या दिवशी सुशांतचा मृत्यू झाला, तेव्हा मी एका व्हिडीओ कॉन्फरन्समध्ये होते. माझ्या आजूबाजूला खूप लोकं होते आणि मी काही करू शकत नव्हते. मला वाटलं की त्याने का मला फोन केला नाही. त्याने मला फोन करायला पाहिजे होता. मी त्याला सांगितले देखील होते की कधी स्वतःचा जीव घेऊ नकोस.”

 

View this post on Instagram

 

A post shared by Smriti Irani (@smritiiraniofficial)

पुढे त्या म्हणाल्या की, “सुशांतची बातमी समजताच मी अमित साधला फोन केला. सुशांतच्या या धक्कादायक बातमीनंतर मी घाबरले होते आणि मला वाटले की अमितही असे काही करू शकतो. माझ्या या शंकेमुळे मी त्याला फोन केला आणि त्याच्याशी सहा तास बोलत होते. त्याने मला विचारले देखील की तुम्हाला काही काम नाही का? मी त्याला म्हटले की मला काम आहे, पण तू बोल,”

पुढे स्मृती इराणी म्हणाल्या. “तू यार स्वतःला कधी मारू नको. मी त्याला काम करताना पाहिले होते. मी त्याला एकदा इफ्फीसाठीही बोलावले होते. ” दरम्यान सुशांतच्या निधनानंतर स्मृती यांनी ट्विट करत लिहिले होते की, “माझ्याकडे कोणतेच शब्द नाही’. सुशांतने १४ जून २०२० रोजी राहत्या घरात गळफास घेत आत्महत्या केली होती. त्याच्या निधनानंतर मोठा गोंधळ देखील निर्माण झाला होता. अनेकांनी त्याची हत्या झाल्याचा देखील दावा केला होता.

दैनिक बाेंबाबाेंबचा व्हाॅटसऍप ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
जिनिलियाच्या तोंडून सर्वांसमोर ‘तो’ गोड शब्द ऐकून लाजेने लाल झाला रितेश देशमुख, व्हिडिओ झाला व्हायरल

राघव चड्ढा यांनी परिणीतीसोबतच्या व्हायरल व्हिडिओवर तोडले मौन; ब्लश हाेत म्हणाले…

हे देखील वाचा