फॅशन जगात आपल्या हॉट आणि ग्लॅमरस लूकने आग लावणाऱ्या मलायकाची तुफान फॅन फॉलोविंग आहे. वयाच्या ४० शी नंतरही ती कमालीची फिट आणि ती नेहमीच तिच्या सिझलिंग लूकने फॅशन जगात नेहमीच वेगवेगळे ट्रेंड सेट करत असते. आज मलायकाला देखील बॉलिवूडमधील फॅशन दिवा म्हणून ओळखले जाते. ती विविध कार्यक्रमांना ती तिच्या लूकने सर्वांचे लक्ष आकर्षित करून घेते. नुकत्याच एका पुरस्कार सोहळ्यामध्ये तिने हजेरी लावली. यावेळी तिने तिच्या मादक लूकने आणि ब्लॅकलेस गाऊनने सर्वांचे लक्ष वेधून घेतले.
तिचे या कार्क्यकर्मातील अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. तिने या ड्रेससोबत तिचे टॅटू देखील फ्लॉन्ट केले. या ड्रेसवर तिने सिल्वर पोनी हेयर स्टाईल देखील केली होती. मात्र आता तिची एवढी मेहनत पूर्ण वाया गेल्याचे चित्र आहे. कारण तिचा हा ड्रेस उर्फी जावेदच्या एका ड्रेसशी खूपच मिळता जुळता निघाला. तिने अनेक महिन्यांपूर्वी तो घातला होता आणि आता मलायकाने तो घातला.
View this post on Instagram
अनेकांना मलायकाचा हा ड्रेस अजिबातच आवडला नाही. तर काहींनी तिला कॉपी केले म्हणून ट्रॉल केले. आता पर्यंत मलायकाने अनेक रिव्हिलिंग ड्रेस घातले आहे. मात्र तिचा हा ड्रेस आणि पाठ फ्लॉन्ट करणे लोकांना अजिबातच आवडलेले दिसत नाही. तिला सोशल मीडियावर ट्रॉल करण्यात येत आहे.
मलायकाने अगदी कमी मेकअप करत एक ब्रेसलेट या ड्रेसवर घालत तिचा लूक पूर्ण केला होता. मात्र ट्रोलर्सने तिची तुलना उर्फीशी केली. एकाने कमेंटमध्ये लिहिले, “उर्फी ची आई….’ दुसऱ्याने लिहिले, “सगळ्याच अभिनेत्री आता उर्फीला फॉलो करत आहे.” एकाने लिहिले, “काहीही घालतात.” तर काहींनी तिच्या हेयर स्टाईलवर कमेंट्स केल्या आहेत. एकाने लिहिले, “केसाला फॉइल पेपर का लावला आहे?” तर एका नेटकऱ्याने “उर्फीची दीदी” मलायकाला म्हटले आहे. तर एकाने लिहिले, “म्हातारपणात ही उर्फीचा रेकॉर्ड मोडत आहे” दरम्यान सध्या ती अरबाज खानपासून वेगळी झाल्यानंतर अर्जुन कपूरसोबत रिलेशनशिपमध्ये आहे.
दैनिक बाेंबाबाेंबचा व्हाॅटसऍप ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
जिनिलियाच्या तोंडून सर्वांसमोर ‘तो’ गोड शब्द ऐकून लाजेने लाल झाला रितेश देशमुख, व्हिडिओ झाला व्हायरल
राघव चड्ढा यांनी परिणीतीसोबतच्या व्हायरल व्हिडिओवर तोडले मौन; ब्लश हाेत म्हणाले…