Sunday, June 8, 2025
Home बॉलीवूड भावाच्या बर्थडे पार्टीत अडखळताना दिसला सोहेल खान; युजर्स म्हणाले, ‘ड्रग ऍडिक्ट…’

भावाच्या बर्थडे पार्टीत अडखळताना दिसला सोहेल खान; युजर्स म्हणाले, ‘ड्रग ऍडिक्ट…’

सलमान खानच्या 57 व्या वाढदिवसानिमित्त वांद्रे येथे ग्रॅण्ड पार्टी देण्यात आली. या पार्टीत शाहरुख खानपासून  संगीता बिजलानीपर्यंत प्रसिद्ध कलाकारांचा समावेश हाेता. मात्र, आता सोमवारी (दि. 27 नाेव्हेंबर)ला रात्री झालेल्या या पार्टीचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. व्हिडिओमध्ये सलमान खानचा भाऊ सोहेल खान ग्रे टी-शर्ट आणि डेनिम जीन्समध्ये दिसत आहे. या व्हिडिओवर साेशल मीडियावर युजर्स साेहेलला ट्राेल करत आहे की, तो दारूच्या नशेत आहे आणि त्याला नीट चालताही येत नाहीये. यापूर्वी, सोहेलची एक्स पत्नी सीमा सचदेह देखील तिच्या अशाच एका व्हिडिओमुळे चर्चेत आली होती.

सोहेल खान (sohail khan) याचा हा लेटेस्ट व्हिडिओ पॅपराझींने इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. यामध्ये साेहेल आधी त्याचा मोठा भाऊ अरबाज खानसोबत आणि नंतर मुलासोबत पोज देताना दिसत आहे. मात्र, व्हिडिओमध्ये सोहेलची चाल संथ आहे. पुढे व्हिडिओमध्ये तो त्याचा धाकटा मुलगा योहानच्या खांद्यावर हात ठेवताना दिसत आहे. कोणत्याही बॉलीवूड पार्टीसाठी असे दृश्य सामान्य असले तरी, सोशल मीडियाचे लोक सध्या सोहेल खानला ट्राेल करण्यासाठी कोणतीही कसर सोडत नाही आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Viral Bhayani (@viralbhayani)

एका युजरने कमेंट करत लिहिले की, “यार, तो खूप नशेत आहे. हा मोठा मुलगा आपल्या वडिलांकडे लाजिरवाण्या नजरेने बघूही शकत नाही.” तर दुसर्‍या युजरने कमेंट करत लिहिले की, “ड्रग अॅडिक्ट…”

विशेष म्हणजे सीमा सजदेह दोनच दिवसांपूर्वी ‘मुव्हिंग इन विथ मलायका’ या शोमध्ये आली होती. जिथे सीमाने तिच्या अशाच एका नशेच्या व्हायरल व्हिडिओचा उल्लेख केला. सीमाचा व्हिडिओ करण जोहरच्या घरी झालेल्या एका जुन्या पार्टीचा होता. सीमाने सांगितले की, “जेव्हा तिचा तो व्हिडिओ व्हायरल झाला, तेव्हा तिला खूप ट्रोल करण्यात आले. लोकांनी सांगितले की, ‘ती इतकी नशेत होती की, तिला उभे राहण्यासाठीही भिंतीचा आधार घ्यावा लागला.'” सीमाने सांगितले की, “या घटनेनंतर  मोठा मुलगा निर्वाणने तिला फोन केला आणि विचारले की, ‘तू कोणता ड्रेस घातला आहेस.’ मी गोंधळल्यावर तो काहीच बोलला नाही. मात्र, मला स्वत:ची लाज वाटली. ते दोन दिवस माझ्या आयुष्यातील नरकासारखे होते.”

सोहेल खान व्यवसायाने अभिनेता, दिग्दर्शक आणि निर्माता आहे. त्याने 1997 मध्ये सलमान खानच्या ‘औजार’ या चित्रपटातून दिग्दर्शनात पदार्पण केले. यानंतर सोहेलने ‘प्यार किया तो डरना क्या’, ‘हॅलो ब्रदर’, ‘जय हो’ आणि ‘फ्रीकी अली’ सारखे चित्रपट बाॅलिवूडला दिले आहेत. सोहेलने 2002 मध्‍ये स्‍वत:च्‍या ‘मैंने दिल तुझको दिया’ या चित्रपटातून अभिनेता म्हणून पदार्पण केले. तो अखेरचा पडद्यावर सलमान खानसोबत ‘ट्यूबलाइट’ चित्रपटात दिसला होता.

सोहेल खानने 1998 मध्ये फॅशन डिझायनर सीमा सजदेहसोबत लव्हमॅरेज केले होते. लग्नाच्या 24 वर्षानंतर दोघांनी 2022 मध्ये घटस्फोट घेतला. त्यांना निर्वाण आणि योहान ही दोन मुले आहेत. (bollywood actor sohail khan drunk video from salman khan birthday party goes viral netizens calls him nasheri)

दैनिक बाेंबाबाेंबचा व्हाॅटसऍप ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
चालत्या ट्रेनमध्ये विकी जैनने पकडला अंकिताचा हात; युजर्स म्हणाले, ‘अहो मॅडम! तुमचा फोन…’

नवीन वर्षाच्या अगाेदर समंथाने शेअर केली नाेट; म्हणाली, ‘जे काही नियंत्रित करू शकतो…’

हे देखील वाचा