बेड मिळवून देऊनही वाचू शकला नाही सोनू सूदचा फॅन, अभिनेता भावुक होऊन म्हणाला…

Bollywood actor sonu sood decided that this is new beggining to help corona patients


बॉलिवूड अभिनेता सोनू सूद हा एका उत्तम अभिनेता तर आहेच, पण सोबतच तो एक चांगला व्यक्ती देखील आहे. याचा प्रत्यय गेल्या एक वर्षापासून आला आहे. कोरोनाच्या पहिल्या लाटेपासून ते आतापर्यंत तो गरजूंना मदत करत आहे. पहिल्या लाटेत त्याने मजूर प्रवाशांना त्यांच्या राज्यात जाण्यासाठी मदत केली होती. लॉकडाऊन झाल्याने मजुरांची कामं गेली होती. त्यामुळे त्यांना खायला देखील नीट मिळत नव्हते. त्यावेळी सोनूने त्यांना त्यांच्या मायदेशी पोहोचवण्याचे काम केले होते. आता देखील तो अनेकांना मदत करत आहे. सोशल मीडियाद्वारे तो अनेक कोरोना रुग्णांना मदत करत आहे.

सोनू सूद अनेकांना ऑक्सिजन आणि व्हेंटिलेटर बेडची सुविधा करून देत आहे. पण कधी कधी विधीलिखित आपण बदलू शकत नाही. अनेक सोयी सुविधा मिळून देखील अनेक रुग्णांना त्यांचा जीव गमवावा लागत आहे. असेच काहीसे सोनू सूदच्या बाबतीत घडले आहे. मदत करून देखील तो एका रुग्णाचा जीव वाचवू शकला नाही. याचे त्याला प्रचंड दुःख झाले आहे.

सोनू सूदच्या एका चाहत्याने त्याला ट्वीट केले होते की, 61 वर्षाच्या राकेश नावाच्या व्यक्तीला दिल्ली एनसीआर जवळ व्हेंटिलेटरसोबत आयसीयू बेडची आवश्यकता आहे. त्याच्या या ट्विटला रीट्विट करत सोनू सूदने लिहिले आहे की, “मी रात्री एक वाजता गाजियाबादमध्ये बेडची सोय केली होती. पण आताच बातमी आली आहे की, त्या व्यक्तीचे निधन झाले आहे.”

सोनू सूदने लिहिले की, “त्याच्या कुटुंबातील व्यक्तींचा आवाज ऐकून माझे हृदय तिथेच तुटले. आजपासून एक नवीन सुरुवात असणार आहे. अनेकांचे आयुष्य वाचवायची वेळ आली आहे.”

या कठीण काळात सोनू रुग्णांना खूप मदत करत आहे. त्याला देखील कोरोनाची लागण झाली होती, पण अवघ्या 6 दिवसात त्याने कोरोनावर मात केली आणि पुन्हा समाज सेवेसाठी उभा राहिला होता.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-काळीज तोडणारी बातमी! अभिनेत्री स्नेहा वाघच्या वडिलांचे निधन, पोस्ट शेअर करत दिली माहिती

-कोरोना काळात औषधांचा काळा बाजार करणाऱ्यांवर संतापला अभिनेता आर माधवन; म्हणाला…

-‘कपडे काढ, मग कळेल तू भूमिकेसाठी योग्य आहेस की नाही!’ ग्लॅमरच्या विश्वाबद्दल अभिनेत्रीने केला मोठा खुलासा


Leave A Reply

Your email address will not be published.