Thursday, April 18, 2024

ओटीटीवर ग्रँड एन्ट्रीसाठी सनी देओल तयारीत; म्हणाला, ‘मला काहीतरी नवीन करायचे आहे’

बॉलिवूड अभिनेता सनी देओल (Sunny Deol) सध्या चांगलाच चर्चेत आहे. 2023 मधील सर्वात हिट चित्रपट ‘गदर 2’ च्या यशानंतर, अभिनेत्याने आता त्याच्या पुढील चित्रपटाची तयारी सुरू केली आहे. राजकुमार संतोषी दिग्दर्शित ‘लाहोर 1947’ या चित्रपटात सनी महत्त्वाची भूमिका साकारताना दिसणार आहे. अलीकडे, त्याच्या आगामी चित्रपटाव्यतिरिक्त, अभिनेता त्याच्या ओटीटी पदार्पणाबद्दल मीडियाशी मोकळेपणाने बोलत होता.

2023 मध्ये सनी देओलच्या ‘गदर 2’ चित्रपटाने बॉक्स ऑफिसवरील सर्व रेकॉर्ड तोडले होते. या चित्रपटात तो अमिषा पटेलसोबत दिसला होता. अलीकडेच एका मुलाखतीदरम्यान अभिनेता म्हणाला, “चित्रपटांव्यतिरिक्त मी डिजिटल प्लॅटफॉर्मवरही काम करण्यास तयार आहे. मला वेब सीरिजमध्ये काम करण्यास कोणतीही अडचण नाही. जर मला वेगळा आणि नवीन विषय मिळाला तर मी लवकरच तुम्हाला OTT प्लॅटफॉर्मवर देखील भेटेन.”

पुढे तो म्हणाला की, “२०२५ हे वर्ष माझ्यासाठी एक खास वर्ष असणार आहे. या वर्षी माझे चित्रपट माझ्या करिअरची नवी दिशा ठरवणार आहेत. नवीन पिढीच्या प्रेक्षकांनी माझे काम पाहावे आणि कौतुक करावे अशी माझी इच्छा आहे. मला आता अशा विषयांवर काम करायचे आहे ज्यावर चित्रपट बनू शकत नाहीत. मला माझ्या चित्रपटांपेक्षा वेगळ्या वेब सीरिजमध्ये काम करायचे आहे. मला असे वाटते की जेव्हा प्रेक्षक मला OTT वर पाहतील तेव्हा त्यांना वाटेल की मी काहीतरी चांगले आणि नवीन केले आहे.”

सध्या सनी देओल आमिर खान निर्मित ‘लाहोर 1947’ या चित्रपटाच्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे. माध्यमातील वृत्तसनुसार या चित्रपटात तो वडील धर्मेंद्र आणि मुलगा करण देओलसोबत दिसणार आहे. या चित्रपटात तो पहिल्यांदा शबाना आझमीसोबत काम करताना दिसणार आहे. तसेच हाती आलेल्या माहितीनुसार सनी देओल ‘सफर’ आणि ‘बॉर्डर’ या चित्रपटांच्या सिक्वेलमध्ये आपले अभिनय कौशल्य दाखवताना दिसणार आहे.

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

हेही वाचा-

करिष्मा कपूरने केला करिअरमधील चढ-उतारांचा खुलासा; म्हणाली, ‘आमच्या वेळी पीआर टीम…’
महाराष्ट्र दिनी प्रदर्शित होणार ‘स्वरगंधर्व सुधीर फडके’ नवीन टिझर प्रदर्शित

हे देखील वाचा