दिवंगत यश चोप्रा यांच्या पत्नी पामेला चोप्रा यांनी काल म्हणजेच गुरुवारी (दि. 20 एप्रिल)ला अखेरचा श्वास घेतला आणि जगाचा कायमचा निरोप घेतला. पामेला ह्या 15 दिवसांपासून रुग्णालयात न्यूमोनियाशी झुंज देत हाेत्या. त्यामुळे त्यांच्या निधनामुळे हिंदी चित्रपटसृष्टीला मोठा धक्का बसला आहे. स्टार्ससह चाहतेही पोस्ट करून पामेला यांना श्रद्धांजली वाहताना दिसत आहेत. त्याचवेळी, पामेला यांच्या शेवटच्या भेटीशी संबंधित एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे, ज्यामध्ये उदय चोप्रा हसताना दिसत आहेत, हे पाहून नेटिझन्स संतप्त झाले आहेत आणि अभिनेत्याला ट्राेल करत आहेत.
पामेला चोप्रा (pamela chopra ) यांच्या अंत्यसंस्कारानंतर शोकग्रस्त कुटुंबीयांचे सांत्वन करण्यासाठी स्टार्स चोप्राच्या जुहू येथील निवासस्थानी पोहोचले. यावेळी आदित्य चोप्रा, उदय चोप्रा, हृतिक रोशन, करण जोहर आणि कतरिना कॅफसह अनेक स्टार्सने आपली उपस्थिती दर्शवली. अशात उदय चोप्राचा याच्याशी संबंधित एका व्हिडिओने नेटिझन्सचे लक्ष वेधले आहे, ज्यामध्ये अभिनेत्याला हसताना पाहून ट्रोल्सनी त्याचा चांगलाच क्लास घेतला आहे.
जुहूच्या चोप्रा निवासस्थानावरून व्हायरल होत असलेला उदयचा हा व्हिडिओ सध्या चर्चेत आहे. त्याचवेळी यावर प्रतिक्रिया देताना एका युजरने लिहिले आहे की, ‘मी पहिल्यांदाच एका मुलाला असे वागताना पाहिले आहे.’ तर दुसर्याने लिहिले, ‘हे अंत्यसंस्कार कमी आणि लग्न समारंभासारखे जास्त दिसत आहे.’ अशात एक युजर कमेंट करत म्हणाला, ‘बेशरम उदय चोप्रा. आईच्या मृत्यूवर हसत आहे.’
View this post on Instagram
शाहरुख खान, आर्यन खान, दीपिका पदुकोण, रणवीर सिंग, श्रद्धा कपूर, कतरिना कैफ, विकी कौशल, नील नितीन मुकेश, सलीम मर्चंट, शिल्पा शेट्टी, काजोल, वैभवी मर्चंट यांसारखे प्रसिद्ध स्टार्सही पामेला चोप्रा यांच्या अंत्यसंस्कारात पाेहचले होते. (bollywood actor uday chopra trolled for smiling after mother pamela demise video viral )
दैनिक बाेंबाबाेंबचा व्हाॅटसऍप ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
‘…तिच्यासाठी खूप मोठी स्वप्न बघणारा…’ मिलिंद गवळी यांनी त्यांच्या पोस्टमधून मंडळी बापाची व्यथा
‘खतरो के खिलाडीची ऑफर नाही’ ‘या’ टीव्ही अभिनेत्याने दिला त्याच्या शोमध्ये सहभागाच्या चर्चांना पूर्णविराम