Thursday, April 18, 2024

वरुण धवनने पत्नी नताशासोबत बीचवर साजरा केला वाढदिवस, फाेटाे व्हायरल

बॉलीवूड इंडस्ट्रीतील उत्कृष्ट अभिनेत्यांपैकी एक  वरुण धवन 24 एप्रिल रोजी त्याचा 36 वा वाढदिवस साजरा करत आहे. अभिनेता हा खास दिवस पत्नी नताशा आणि मित्रांसोबत साजरा करत आहे. त्याची एक झलक त्याने त्याच्या अधिकृत इंस्टाग्राम अकाउंटवर शेअर केली आहे, जी साेशल मीडियावर तुफान व्हायरल हाेत आहे.

अभिनेता वरुण धवन (varun dhawan) याने इंस्टाग्रामवर 6 फाेटाे पाेस्ट केल आहेत. शेअर केलेल्या फोटोंमध्ये तो पत्नी नताशा दलालसोबत केक कापताना दिसत आहे. सेलिब्रेशनचे फोटो शेअर करत अभिनेत्याने कॅप्शनमध्ये लिहिले की, ‘बर्थडे विथ द बेस्ट क्रू. तुमच्या शुभेच्छांबद्दल धन्यवाद. 36ची सुरुवात.’

वरुण आणि नताशा लहानपणापासूनच एकमेकांना ओळखतात. शालेय शिक्षण शिकत असताना वरुण त्याची मैत्रीण नताशाच्या प्रेमात पडला. असे म्हटले जाते की, वरुणने नताशाला प्रपोज केले तेव्हा नताशाने त्याला नकार दिला हाेता, परंतु अभिनेत्याने हार मानली नाही. अखेर नताशाने वरुणचे प्रेम समजून होकार दिला. त्यानंतर दोघांनी अनेक वर्षे एकमेकांना डेट केले. अनेक वर्षे एकमेकांना डेट केल्यानंतर या जोडप्याने जानेवारी 2021मध्ये अलिबागमध्ये लग्न केले.

 

View this post on Instagram

 

A post shared by VarunDhawan (@varundvn)

वरुण धवनच्या वर्क फ्रंटबद्दल बाेलायचे झाले, तर अभिनेता शेवटचा ‘भेडिया’मध्ये दिसला होता. अशात अभिनेता लवकरच ‘बवाल’, ‘रणभूमी’ आणि ‘इक्कीस’मध्ये दिसणार आहे. याशिवाय वरुण सिटाडेलच्या हिंदी व्हर्जनमध्ये सामंथा रुथ प्रभूसोबत दिसणार आहे. याशिवाय अभिनेता ‘भेडिया 2’मध्येही दिसणार आहे. मॅडॉक फिल्म्स आणि जिओ स्टुडिओचा हा चित्रपट 2025 मध्ये प्रदर्शित हाेईल. या चित्रपटात वरुण धवन मुख्य भूमिकेत दिसणार आहे. मात्र, फीमेल लीडचा खुलासा अद्याप झालेला नाही. अमर कौशिक या चित्रपटाचे दिग्दर्शन करणार आहेत.(bollywood actor varun dhawan celebrates birthday with wife natasha on the beach shares pictures)

दैनिक बोंबाबोंबचा व्हॉट्सऍप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बोंबाबोंबचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
ब्लू टिक फ्री मिळाल्यावर फसवणूक केल्याचे जाणवत आहे बिग बींना; म्हणाले, ‘पैसे भरवा लिओ हमारा’

“ही आहे ‘दाद’ दर्दी रसिकांची… ” प्रशांत दामले यांनी ‘ती’ पोस्ट शेअर करत मानले प्रेक्षकांचे आभार

हे देखील वाचा