Thursday, June 13, 2024

अदिती राव हैदरी ‘या’ अभिनेत्यासाेबत राजस्थानमध्ये घेतेय सुट्टयांचा आनंद, फाेटाे व्हायरल

ताज‘ चित्रपटात आपले सौंदर्य आणि दमदार अभिनय दाखवणारी आदिती राव हैदरी सध्या सुट्टयांचा आनंद घेत आहे. मात्र, या सुट्टयांचा आनंद आदिती एकटी घेत नसून तिच्यासाेबत ‘रंग दे बसंती‘ फेम सिद्धार्थ आहे. अशात दोघेही राजस्थानमध्ये एकत्र सुट्टी एन्जॉय करत आहेत.

अदिती राव हैदरी (aditi rao hydari ) आणि सिद्धार्थ (siddhartha) यांचे राजस्थानमध्ये सुट्टी साजरे करतानाचे फोटो अभिनेत्री-राजकारणी बनलेल्या बिना काक यांनी शेअर केले आहेत. फोटो शेअर करताना बीना काक यांनी कॅप्शनमध्ये लिहिले की, ‘सर्वात जास्त आनंद तेव्हा होतो, जेव्हा मुले माझ्या घरी येतात.’

बीना काक यांनी शेअर केलेल्या पहिल्या फोटोमध्ये अदिती राव हैदरी पायऱ्यांवर बसून पोज देत आहे. या फोटोत अभिनेत्रीसाेबत एक गोंडस कुत्राही दिसत आहे, तर दुसऱ्या फोटोमध्ये सिद्धार्थही बिना काकसोबत दिसत आहे. बीना काक यांनी दोघांनाही जवळ घेतले असून सुंदर पाेज दिल्या आहेत.

 

View this post on Instagram

 

A post shared by Bina Kak (@kakbina)

व्हायरल झालेल्या फाेटाेंमध्ये आदितीने काळा आणि पांढरा टी-शर्टसह निळा डेनिम परिधान केला आहे, तर बिना काक सर्व-पांढऱ्या आऊटमध्ये दिसत आहेत. अदिती आणि सिद्धार्थ शुक्रवारी (2 जुन)ला एकत्र मुंबईतून बाहेर पडताना दिसले हाेते. अशात अदिती आणि सिद्धार्थ एकमेकांना डेट करत असल्याच्या बातम्याही चांगल्याच व्हायरल हाेऊ लागल्या. दोघेही अनेकदा एकत्र दिसत आहेत. मात्र, त्यांनी डेटिंगच्या बातम्यांवर काेणतीही अधिकृत माहिती दिली नाही.

 

View this post on Instagram

 

A post shared by Aditi Rao Hydari (@aditiraohydari)

आदितीच्या आगामी प्राेजेक्ट्सबद्दल बाेलायचे झाले, तर ती संजय लीला भन्साळी यांच्या ‘हीरामंडी’ या वेब सीरिजमध्ये दिसणार आहे, ज्याची चाहते आतुरतेने वाट पाहत आहेत.(bollywood actress aditi rao hydari enjoy the vacation with actor siddhartha in rajasthan see the latest photos of actress)

दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
वाढदिवस विशेष : बॉलिवूडचा कॉमेडी किंग विजय राजचा, असा आहे थक्क करणारा प्रवास

BIRTHDAY SPECIAL | रंभाने अभिनय सोडून केले होते लग्न, घटस्फोट आणि आत्महत्येच्या बातम्यांनी वेधले होते लक्ष

हे देखील वाचा