Monday, June 24, 2024

आदितीने कान्स फिल्म फेस्टिवलमध्ये वेधले सर्वांचे लक्ष, अभिनेत्रीचा क्लासी लूक पाहून चाहते थक्क

अदिती राव हैदरी ही बॉलिवूडमधील उत्कृष्ट अभिनेत्रींपैकी एक आहे, तिने हिंदी चित्रपटसृष्टीत अनेक दमदार चित्रपट केले आहेत. आदितीची स्टाईल कायमच लाेकांचे लक्ष वेधून घेते. मात्र, यावेळी तिचे चर्चेत येण्याचे कारण खूपच खास आहे. खरे तर, अभिनेत्रीचा कान्स लूक खूप पसंत केला जात आहे.

कान्स लूकसाठी अदिती (aditi rao hydari) हिने पिवळ्या रंगाचा स्ट्रॅपलेस गाऊन परिधान केला असून गाेल्डन झुमके आणि रिंग घातली हाेती. आदितीच्या हेअर स्टाईलबाबत बाेलायचे झाले, तर अभिनेत्रीने खुल केस साेडून कमीत कमी मेअकप केला हाेता, जाे तिच्या साैंदर्यात आणखीनच भर घालत हाेता. अशात अभिनेत्रीचा कान्स फिल्म फेस्टिवल 2023मधील लूक चाहत्याना प्रचंड आवडला आहे.

अदिती राव हैदरी हिने कान्सचे फोटो तिच्या सोशल मीडियावर शेअर केले आहेत, ज्याच्या कॅप्शनमध्ये तिने लिहिले की, ‘फुल ब्लूम’, अभिनेत्रीने हे फाेटाे पाेस्ट करताच साेशल मीडिया युजर्स अभिनेत्रीच्या फाेटाेवर लाईक आणि कमेंट्सचा वर्षाव करत आहेत. एका चाहत्याने कमेंट करत लिहिले की, ‘उफ तू इतकी सुंदर कशी असु शकतेस?’ त्याच वेळी एका चाहत्याने अभिनेत्रीच्या फाेटाेवर कमेंट करत लिहिले की, ‘अरे व्वा! अप्रतिम.’

 

View this post on Instagram

 

A post shared by Aditi Rao Hydari (@aditiraohydari)

मंडळी, आदिती राव हैदरीने लॉरियल पॅरिसची ब्रँड अॅम्बेसेडर म्हणून रेड कार्पेटवर वॉक केला. आदितीच्या वर्क फ्रंटबद्दल बाेलायचे झाले, तर अभिनेत्री सध्या तिच्या ‘जुबली और ताज: डिवाइडेड बाय ब्लड’ या वेब शोच्या यशाचा आनंद घेत आहे. याशिवाय ती संजय लीला भन्साळी यांच्या ‘हीरामंडी’ या वेब सीरिजमध्येही दिसणार आहे, ज्याची तिचे चाहते आतुरतेने वाट पाहत आहेत.(bollywood actress aditi rao hydari cannes look grabbed headlines photos looked very classy )

हे देखील वाचा