बॉलिवूडमधील लोकप्रिय अभिनेत्री ऐश्वर्या राय हीने तिच्या अभिनयाने आणि सौंदर्याने सर्वत्र ओळख निर्माण केली आहे. तिच्या सौंदर्यासोबतच तिच्या सेंस ऑफ ह्यूमरसाठी देखील ती चर्चेत असते. अशातच तिचा एक जुना व्हिडिओ सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होताना दिसत आहे. या व्हिडिओमध्ये ऐश्वर्या एका इंटरनॅशनल चॅट शोमध्ये दिसत आहे. या शोमध्ये ती डेव्हिड लेटरमॅन सोबत एका मुलाखतीत दिसत आहे. ती या शोमध्ये पाहुणी म्हणून गेली होती. हा व्हिडिओ व्हायरल होण्याचे कारण हे आहे की, ऐश्वर्याला भारतीय संस्कृतीबाबत प्रश्न विचारले होते आणि तिने त्यावर बरेच रंजक उत्तर दिले.
यावेळी त्यांनी ऐश्वर्याला भारतीय सभ्यतेवरून प्रश्न विचारले. यावर तिने असे काही उत्तर दिले की, डेव्हिड लेटरमॅन शांतच झाला. यावेळी त्याने ऐश्वर्याला प्रश्न विचारलं की, “तू खरचं तुझ्या आई वडिलांसोबत राहते का?” त्याचा हा प्रश्न ऐकून ऐश्वर्याने उत्तर दिले की, “हो!! हे खरं आहे की, मी अजूनही माझ्या आई वडिलांसोबत राहते.”
ऐश्वर्याचे हे उत्तर ऐकून तो तिला प्रश्न विचारतो की, “मोठे झाल्यावर आई वडिलांसोबत राहणे ही गोष्ट भारतात सामान्य आहे का??” यावर ऐश्वर्या अत्यंत मजेशीर अंदाजात उत्तर देते की, “मोठे झाल्यावरही आई वडिलांसोबत राहणे ही भारतात अत्यंत सामान्य गोष्ट आहे. कारण आम्हाला आई वडिलांसोबत जेवण्यासाठी त्यांची परवानगी नाही घ्यावी लागत.” तिचे हे उत्तर ऐकून डेव्हिड एकदम शांत होतो. यानंतर तो तिला भारतीय भाषेवरून प्रश्न विचारतो. (Bollywood actress Aishwarya Rai Bachchan give answer to david letterman when he ask her about Indian culture)
यावरही ऐश्वर्या मजेशीर अंदाजात उत्तर देते. ती म्हणते की, “आमच्याकडे बोलण्यासाठी अनेक भाषा आहेत. फक्त हिंदी आणि इंग्लिश नाही तर भारतात अनेक भाषांचा वापर केला जातो.” २००४ मध्ये तिचा ‘प्राईज एंड प्रेजुडीस’ हा चित्रपट प्रदर्शित झाला होता. तेव्हा ती या चॅट शोमध्ये सहभागी झाली होती.
दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…
हेही नक्की वाचा-
-यामी गौतमची बहीण सुरिलीने केला तिचा साज श्रृंगार; अभिनेत्रीने केला लग्नातील न पाहिलेला व्हिडिओ