‘तुला प्रेग्नेंट राहायला आवडते का?’, म्हणणाऱ्या युजरची अभिनेत्रीने केली बोलती बंद; म्हणाली, ‘आता बास…’

Trolls make fun of Lisa Haydons pregnency Lisa give answer


बॉलिवूड अभिनेत्री लिसा हेडन लवकरच तिसऱ्यांदा आई बनणार आहे. लिसा तिच्या गरोदरपणातील बेबी बंप फ्लॉन्ट करतानाचे प्रत्येक दिवशी ग्लॅमरस फोटो सोशल मीडियावर शेअर करत असते. नुकतेच अभिनेत्रीने इंस्टाग्रामवर तिचे काही फोटो शेअर केले आहेत. यांनतर युजरने तिला खूप ट्रोल केले. लिसाने यावर असे काही उत्तर दिले आहे की, यावर युजरची बोलती बंद झाली आहे.

लिसा हेडनने शनिवारी (१२ जून) सकाळी एका मॅगझिनसाठी फोटोशूट केले आहे. हे फोटो तिने इंस्टाग्रामवर शेअर केले आहेत. यावेळी एका युजरने तिच्या प्रेग्नेंसीची खिल्ली उडविली आहे. त्याने या फोटोवर कमेंट केली की, “असे वाटतं की, तू प्रत्येक वेळेस प्रेग्नेंट असते. तुला प्रेग्नेंट राहायला खूप आवडते का??” या युजरला लिसाने उत्तर देत लिहिले आहे की, “हो मला प्रेग्नेंट व्हायला खूपच आवडते. ही एक खूप खास वेळ असते. पण आता बास आणखी नाही. या मुलाला जन्म दिल्यानंतर मला माझे आयुष्य एन्जॉय करायचे आहे.” एका महिन्यात कधीही तिची डिलीवरी होऊ शकते.

काही दिवसांपूर्वी लिसाने तिच्या इंस्टाग्राम अकाऊंटवरून एक फोटो शेअर केला होता. यातून तिने सांगितले होते की, ती प्रेग्नेंसीवरून खूप नर्व्हस आहे. तिने एक पोस्ट करून लिहिले होते की, “त्या माता ज्या आपल्या होणाऱ्या बाळासाठी थोड्याशा नर्व्हस आहेत. खास करून ज्यांच्याकडे आधीच एक बाळ आहे आणि दुसरे येणार आहे. मला बाळाच्या भावनांची चिंता वाटत आहे की, ते त्यांच्या भावना कशा मंडणार आहे. जेव्हा ते बोलायला लागेल. बाळा तुझ्यावर मी नेहमीच प्रेम करत राहील. हे माहीत आहे की, तुझी बहिण 10 आठवड्यात येणार आहे.”

लिसा हेडनने अनेक चित्रपटात काम केले आहे. तिने ‘हाऊसफुल 3′ ,’क्वीन’, ‘यह दिल है मुश्किल’,‌ ‘रास्कल’, ‘आयशा’, ‘बादशाहो’ या चित्रपटात काम केले आहे.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-‘तुम्ही त्याचा टीआरपीसाठी वापर केला आणि…’, पवनदीपच्या परफॉर्मन्सवर कात्री चालवणाऱ्या निर्मात्यांवर भडकले चाहते

-‘…सर्वकाही डोळ्यात असतं!’, म्हणत मराठमोळ्या अमृता खानविलकरचं ब्लॅक ऍंड व्हाईट फोटोशूट आलं चर्चेत

-घरामध्ये आई जया बच्चनला नाही, तर बायको ऐश्वर्याला घाबरतो अभिषेक बच्चन, बहीण श्वेताने केला खुलासा


Leave A Reply

Your email address will not be published.