यामी गौतमची बहीण सुरिलीने केला तिचा साज श्रृंगार; अभिनेत्रीने केला लग्नातील न पाहिलेला व्हिडिओ

बॉलिवूड अभिनेत्री यामी गौतम हिचे लग्न होऊन आता बरेच दिवस झाले आहेत. पण अजूनही तिच्या लग्नाचे फोटो अजून सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. तिने दिग्दर्शक आदित्य धरसोबत लग्न केले आहे. त्यांनी अत्यंत साध्या पद्धतीने लग्न केल्यामुळे त्यांचे लग्न सध्या खूप चर्चेत आहे. लग्नाच्या आधीचे आणि नंतरचे फोटो शेअर केल्यानंतर आता यामीने एक व्हिडिओ शेअर केला आहे. यामध्ये ती साजशृंगार करताना दिसत आहे. यामध्ये तिची बहिण सुरिली गौतम तिला बांगड्या, पैंजण घालताना दिसत आहे.

यामी गौतमने हा व्हिडिओ तिच्या अधिकृत इंस्टाग्राम अकाऊंटवरून शेअर केला आहे. यामध्ये यामी लाल रंगाची साडी घालून बसलेली दिसत आहे. तिच्या नाकात नथ आहे, तर तिची बहीण तिला इतर दागिने घालताना दिसत आहे. या व्हिडिओमध्ये ती खूपच सुंदर दिसत आहे. तिने हा‌ व्हिडिओ शेअर करून तिच्या बहिणीला टॅग केले आहे आणि सोबतच हार्टची ईमोजी पोस्ट केला आहे.

View this post on Instagram

A post shared by Yami Gautam Dhar (@yamigautam)

तसेच तिची बहीण सुरिली गौतमने देखील यामीच्या मेहेंदी फंक्शनचा एक व्हिडिओ शेअर केला होता. यामध्ये देखील ती खूप खुश दिसत होती. या व्हिडिओमध्ये दोन बहिणींमधील प्रेम आणि बॉंडिंन प्रेक्षकांना साफ दिसत होती. लग्नामध्ये यामीने तिच्या आईची 33 वर्ष जुनी सिल्कची साडी घातल्यामुळे देखील ती खूप चर्चेत होती.

यामीने 2019 मध्ये ‘उरी’ या चित्रपटात काम केले आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शक आदित्य धर हे होते. त्या दोघांनी केवळ कुटुंबाच्या आणि जवळच्या मित्रांच्या उपस्थितीत त्यांचे हे लग्न केले आहे. इंस्टाग्रामवर पोस्ट करून त्यांनी लिहिले होते की, “आमच्या कुटुंबियांच्या आशीर्वादाने आज आम्ही लग्न बंधनात अडकलो आहोत. खूप कमी लोकांमध्ये हा सोहळा पार पडला आहे. आम्ही केवळ आमच्या कुटुंबीयांमध्ये लग्न केले आहे.”

यामीने विकी कौशल सोबत ‘उरी: द सर्जिकल स्टाईक’मध्ये काम केले होते. या चित्रपटाचे दिग्दर्शक आदित्य धर हे होते. तिच्या कामाबद्दल बोलायचे झाल्यास, ती ‘दसवी’ आणि ‘भूत पुलिस’ या आगामी चित्रपटात दिसणार आहे. याआधी तिने ‘काबिल’ आणि ‘विक्की डोनर’ या चित्रपटात काम केले आहे.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-‘तुला प्रेग्नेंट राहायला आवडते का?’, म्हणणाऱ्या युजरची अभिनेत्रीने केली बोलती बंद; म्हणाली, ‘आता बास…’

-‘तुम्ही त्याचा टीआरपीसाठी वापर केला आणि…’, पवनदीपच्या परफॉर्मन्सवर कात्री चालवणाऱ्या निर्मात्यांवर भडकले चाहते

-‘…सर्वकाही डोळ्यात असतं!’, म्हणत मराठमोळ्या अमृता खानविलकरचं ब्लॅक ऍंड व्हाईट फोटोशूट आलं चर्चेत

Latest Post