बाॅलिवूड अभिनेत्री आलिया भट्ट सध्या तिच्या आगामी ‘रॉकी और रानी की प्रेम कहानी‘ या चित्रपटामुळे चर्चेत आहे. आलियाने तिच्या अभिनय कारकिर्दीत अनेक हिट चित्रपट दिले आहेत. मात्र, आलिया चित्रपटांव्यतिरिक्त तिच्या सामान्य ज्ञानासाठी चांगलीच चर्चेत असते. या कारणास्तव अभिनेत्रीला करिअरच्या सुरुवातीच्या काळात अनेक ट्राेलिंगचा सामना देखील करावा लागला हाेता. अशात आलिया पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. काय आहे नेमके प्रकरण? चला, जाणून घेऊया…
अभिनेत्री आलिया भट्ट (alia bhatt ) हिला अनेकदा ट्राेलिंगचा सामना करवा लागताे. असे असले तरी आलिया मात्र खचलेली नाही. ती फक्त तिच्या कामाबद्दल जागरूक असते आणि त्या बदल्यात चांगल्या फीचीही अपेक्षा करते. नुकत्याच झालेल्या एका कार्यक्रमात आलियाला याबद्दल विचारण्यात आले होते की, ‘तिला युवा इन्फ्लुएंसर म्हणणे सोयीचे आहे का?’ यावर तिने उत्तर दिले की, ‘तिला जोकर म्हणण्यात काही अडचण नाही, जर चेक वेळेवर पोहोचला तर.’
अभिनेत्रीच्या अभिनय कारकिर्दीबद्दल बोलायचे, तर ती अखेरची ‘ब्रह्मास्त्र : पार्ट वन’मध्ये रणबीर कपूरसोबत दिसली होती. दुसरीकडे, आलिया सध्या करण जोहरच्या आगामी ‘रॉकी और रानी की प्रेम’ कहानीच्या रिलीजसाठी तयारी करत आहे, ज्यामध्ये ती रणवीर सिंगच्या विरुद्ध आहे. जया बच्चन, धर्मेंद्र आणि शबाना आझमी यांसारखे अनेक दिग्गज कलाकार या चित्रपटात महत्त्वाच्या भूमिकेत आहेत.
View this post on Instagram
नुकतेच निर्मात्यांनी ‘तुम क्या मिले’ हे पहिले गाणे आणि चित्रपटाचा ट्रेलर रिलीज केला. दोघांनाही प्रेक्षकांचा सकारात्मक प्रतिसाद मिळाला. आलियाने अलीकडेच तिच्या प्रेग्नंसीनंतर एका रोमँटिक गाण्याच्या शूटिंगचा अनुभवही शेअर केला आहे. ‘रॉकी और रानी की प्रेम कहानी’ 28 जुलै रोजी सिनेमागृहात प्रदर्शित हाेणार आहे. (Bollywood actress alia bhatt okay with being called clown as long as cheque comes on time )
अधिक वाचा-
चित्तथरारक ’72 हूरें’ चित्रपट झाला प्रदर्शित; वाचा लोकांचे जबरदस्त रिव्ह्यू
केवळ 13 वर्षांचे असताना गायनासाठी सोडले होते घर; तर असा होता कैलाश खेर यांचा संगीत क्षेत्रातील खडतर प्रवास